शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वेकोलिच्या निवृत्त कर्मचाऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 20:11 IST

सायबर गुन्हेगारांनी केवायसी करून देण्याच्या नावाखाली वेकोलिच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याचे ५ लाख ९१ हजार लंपास केले. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपाच लाख ९१ हजार लंपास : एमआयडीसीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सायबर गुन्हेगारांनी केवायसी करून देण्याच्या नावाखाली वेकोलिच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याचे ५ लाख ९१ हजार लंपास केले. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.दीपक गजानन राईरकर (वय ६१) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. ते एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णविहार फेस नंबर २ मध्ये राहतात. त्यांना ८ जूनला दुपारी २च्या सुमारास एका व्यक्तीचा फोन आला. मी पेटीएम ऑफिसमधून बोलतो, असे सांगून आरोपीने राईरकर यांना तुमचे केवायसी झाले नाही. ते तात्काळ करावे लागेल, असे सांगून मी जी माहिती विचारतो ती सांगा आणि मी जसे म्हणतो तसे तुम्ही करा, असे म्हणून आरोपीने त्यांच्या मोबाईलवर एक ओटीपी नंबर पाठवला. तो ओटीपी नंबर विचारून प्रारंभी आरोपीने त्यांच्या खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीला फोन केला तेव्हा तुमची रक्कम लगेच तुमच्या खात्यात जमा होईल, अशी थाप मारून मी सांगतो तसे करा, असे म्हणून आरोपीने पुन्हा त्यांना क्विक रिस्पॉन्स सपोर्ट आप वर जाण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या एका साथीदाराने जसे सांगितले तसे राईरकर यांनी केले. त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्या खात्यातून कधी ४० हजार तर कधी ५० हजार असे एकूण ११ वेळा ५ लाख ९० हजार ९८० रुपये वळते झाले. राईरकर यांनी ही माहिती आपल्या एका मित्राला सांगितली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी राईरकर यांच्या तक्रारीवरून सायबर गुन्हेगारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.इशारा मिळाला होताविशेष म्हणजे, जेव्हा पहिल्यांदा सायबर गुन्हेगारांनी राईरकर यांना ओटीपी नंबर पाठवला. त्याचवेळी त्यांना एक मेसेज आला. तुम्ही जर ओटीपी नंबर शेअर केला तर तुमच्या खात्यातून ५० हजार रुपये कमी होतील, असा हा इशारा वजा मेसेज होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सायबर गुन्हेगारांच्या थापेबाजीला बळी पडल्यामुळे राईरकर यांना आपले पाच लाख ९१ हजार रुपये गमवावे लागले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमWestern Coal Fields Limited Nagpurवेस्टन कोल फिल्डस् लिमिटेड नागपूर