शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हेगारांकडून ‘पीएफ’ आयुुक्तांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 19:19 IST

क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आयुक्तांना ३ लाखाने गंडविल्याची घटना सक्करदरा ठाण्याच्या परिसरात घडली आहे. मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत ही घटना घडल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.

ठळक मुद्दे३ लाख रुपये उडविले : सायबर गुन्हेगारांच्या टोळीचे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रेडिट कार्ड बंद होणार असल्याची बतावणी करून सायबर गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीने भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आयुक्तांना ३ लाखाने गंडविल्याची घटना सक्करदरा ठाण्याच्या परिसरात घडली आहे. मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत ही घटना घडल्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.विकास कुमार जीवट महाशेट (४३) हे सक्करदऱ्याच्या पीएफ कार्यालयात आयुक्त आहेत. तर जावेद खान, अजय गायकवाड, विशाल अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना ११ मे रोजी घडली. विकास कुमार आपल्या कार्यालयात हजर होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना अ‍ॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड बंद झाल्याचे सांगितले. विकास कुमार यांनी आपल्या बँक खात्यांची माहिती जाणून घेतली असता त्यांच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डमधून ८३ हजार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डमधून २.१३ लाख रुपये उडविल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच त्यांना धक्का बसला. त्यांनी जावेद खान नावाच्या आरोपीला फोन केला. त्याने दोन्ही खात्यातून काढलेली रक्कम आपल्या खात्यात असल्याचे सांगितले. ही रक्कम मिळविण्यासाठी ५ हजार रुपये पाठविण्यास सांगितले. त्याने विकास कुमार यांना गुगल पे आणि पेटीएम खात्यांची माहिती दिली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विकास कुमार यांंनी तीन किस्तीत पाच-पाच हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतरही आरोपी विकास कुमार यांना पैसे मागतच होते. आपली फसवणुक झाल्याची शंका येताच विकास कुमार यांनी सक्करदरा पोलीस आणि सायबर सेलमध्ये तक्रार केली. तपासाच्या आधारे पोलिसांनी फसवणुक आणि आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सायबर गुन्हेगारांच्या आंतरराज्यीय टोळीचा समावेश आहे. त्यांचे जाळे राजस्थान, आसाम, जमशेदपूर, मुंबईसह इतर शहरात पसरले आहे. विकास कुमार यांच्या खात्यातून काढलेली रक्कम अनेक खात्यात ट्रान्सफर करण्यात आली आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी