शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक तंगीत असलेल्या दिव्यांगाची लाखो रुपयांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 19:37 IST

रेल्वेमध्ये साहित्याची विक्री करून एक एक रुपया गोळा केला. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एका कंपनीच्या डीलरला लाखो रुपये दिले. परंतु डीलरने फसवणूक केल्याने, इमामवाड्यातील एक दिव्यांग न्यायासाठी पोलिसांची विनवणी करतो आहे. सध्या लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद असल्याने त्याचा रोजगारही बुडाला आहे. दिव्यांगाची आर्थिक फसवणूक करणारा भामटा मात्र मोकाट फिरतो आहे.

ठळक मुद्देन्यायासाठी पोलिसांकडे विनवणी : फसवणूक करणारा फिरतोय मोकाट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेमध्ये साहित्याची विक्री करून एक एक रुपया गोळा केला. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एका कंपनीच्या डीलरला लाखो रुपये दिले. परंतु डीलरने फसवणूक केल्याने, इमामवाड्यातील एक दिव्यांग न्यायासाठी पोलिसांची विनवणी करतो आहे. सध्या लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद असल्याने त्याचा रोजगारही बुडाला आहे. दिव्यांगाची आर्थिक  फसवणूक करणारा भामटा मात्र मोकाट फिरतो आहे.विष्णू शंकर डोंगरे असे या दिव्यांगाचे नाव आहे. विष्णू दृष्टिहीन आहेत. ते रेल्वेमध्ये विविध साहित्याची विक्री करून कुटुंबाचा गुजारा करतात. इमामवाडा येथील झोपडपट्टीमध्ये किरायाच्या घरात पत्नी व दोन मुलांसह ते राहतात. विष्णूने रेल्वेत साहित्य विकून पै-पै जमविली आणि पत्नीच्या मदतीने नवीन रोजगार सुरू करावा म्हणून ते प्रयत्नरत होते. त्यांनी श्री लक्ष्मीनारायण ट्रेडर्सने प्रसिद्ध केलेली एक जाहिरात बघितली. या जाहिरातीमध्ये कापसाच्या वाती करण्याची मशीन कंपनी उपलब्ध करून देणार होती. सोबतच कापसाच्या वाती ५ वर्षे खरेदी करणार होती. विष्णूकडून त्या कंपनीचा डीलर संतोष कांबळे याने १,३२,९५५ रुपये घेतले. २०० रुपये प्रमाणे विष्णूने कापूसही खरेदी केला. या कापसाच्या वाती ७०० रुपये प्रमाणे संतोष कांबळे विकत घेणार होता. परंतु विष्णूला त्याने दिलेली मशीन खराब निघाली. त्याने मशीनचे गॅरंटी वॉरंटीचे दस्तऐवज दिले नाही. विष्णूसोबत केलेला ५ वर्षाचा करारही बनावट निघाला. आपण फसल्याचे लक्षात आल्यानंतर विष्णूने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याला इमामवाडा पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. इमामवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी संतोष कांबळे व विष्णू यांचे बयाण लिहून घेतले. पोलिसांनी संतोष कांबळे याला पैसे परत दे असे सांगितले. मात्र संतोषने एक रुपयाही त्यांना दिला नाही. त्यामुळे आता विष्णू पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहेत. पोलिसांकडूनही त्यांना टाळले जात आहे.लॉकडाऊनमुळे हातचा रोजगार हिरावला आहे. घरात कुटुंबीयांची उपासमार होत आहे. अशात पोलिसांनी संतोष कांबळेकडून पैसे परत मिळवून द्यावे, अशी अपेक्षा विष्णूची आहे. अशा आपत्तीच्या काळात या दृष्टिहीनाच्या पाठीशी कुणीही उभा नसल्याने तो हतबल झाला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर