शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 13:42 IST

कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या नावांखाली एका आरोपीने अनेकांचे लाखो रुपये हडपल्याची बाब नागपुरात सोमवारी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या नावांखाली एका आरोपीने अनेकांचे लाखो रुपये हडपल्याची बाब नागपुरात सोमवारी उघडकीस आली. मंजूनाथ व्यंकटेश मूर्ती उर्फ पाटील (वय ५१) असे आरोपीचे नाव आहे. तो मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगजवळच्या पावनभूमीतील प्रगती हाऊसिंग सोसायटीत राहतो. त्याने फसविलेल्या १९ जणांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.सोनेगाव पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पाटील हा गरजूंना झटपट कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवायचा. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या मालमत्तेची कागदपत्रे मागून घ्यायचा. त्याचा सर्च व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळवण्याच्या नावाखाली रक्कम उकळायचा. नंतर स्थावर मालमत्तेचे गहाण खत रजिस्टर करण्यासाठी स्टॅम्प ड्युटीच्या नावाखाली कर्जाच्या रकमेच्या १ टक्का रक्कम घ्यायचा. त्याने अशा प्रकारे १९ जणांकडून सर्च व्हेरिफिकेशन रिपोर्ट मिळवण्याच्या नावाखाली ४ लाख, ४४ हजार, १०० रुपये हडपले. नंतर स्टॅम्प ड्युटीच्या नावाखाली तिघांकडून ७ लाख, ३० हजार रुपये उकळले. १५ नोव्हेंबर २०१८ ते २० डिसेंबर २०१८ या कालावधीत त्याने कुणाकडून रोख तर कुणाकडून धनादेश घेऊन एकूण ११, ७४, १०० रुपये उकळले. त्याचप्रमाणे राकेश गणेशप्रसाद दुबे (वय ४७) यांच्याकडून ६८, ६७६ रुपयांचे तीन लॅपटॉप नेले. मात्र, कुणालाही त्याने कसलेही कर्ज मिळवून दिले नाही. त्याची बनवाबनवी उघड झाल्यानंतर नितीन अशोक दीक्षित (वय ४०, रा. श्रीनगर, नरेंद्रनगर) यांच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी