शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संस्थेच्या सचिवाची बनवाबनवी : शासनाला १.२८ लाखाचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 23:04 IST

शिक्षण संस्थेच्या सचिवाने बनावट नियुक्ती दाखवून शासनाचे १ लाख २८ हजार रुपये हडपले. तब्बल १७ वर्षांनंतर हा गैरप्रकार उघडकीस आला. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रहमान खान (वय ६८) असे आरोपीचे नाव आहे. ते पोलीस लाईन टाकळीच्या बाजूला असलेल्या राठोड लेआऊटमध्ये राहतात.

ठळक मुद्देबोगस नियुक्ती दाखविली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण संस्थेच्या सचिवाने बनावट नियुक्ती दाखवून शासनाचे १ लाख २८ हजार रुपये हडपले. तब्बल १७ वर्षांनंतर हा गैरप्रकार उघडकीस आला. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सक्करदरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रहमान खान (वय ६८) असे आरोपीचे नाव आहे. ते पोलीस लाईन टाकळीच्या बाजूला असलेल्या राठोड लेआऊटमध्ये राहतात.सक्करदऱ्यातील सुभेदार लेआऊटमध्ये शादाभ एज्युकेशन सोसायटी आहे. या संस्थेचे सचिव म्हणून रहमान खान कार्यरत होते. संस्थेमार्फत संचालित एचबीटी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात खान यांनी १ मार्च २००० ला पी. टी. राठोडची शिपाई म्हणून नियुक्ती दाखविली. तो कार्यरत नसतानादेखील त्याच्या नावाने १ जुलै २००२ या सव्वादोन वर्षांच्या कालावधीत पगार आणि इतर खर्चापोटी १ लाख २८ हजार ३०६ रुपये शासकीय तिजोरीतून उचलले. त्यानंतर या संस्थेचे संचालक मंडळ बदलले. मात्र, बोगस शिपाई नियुक्तीचा प्रकार कुणाच्याच लक्षात आला नाही. अलीकडे संचालक मंडळाच्या लक्षात हा गैरप्रकार आला. त्यामुळे त्यांनी उच्च शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदवली. शिक्षण विभागाने चौकशी केल्यानंतर या तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आल्याने, नागपूर विभागाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. अर्चना नेरकर यांनी सक्करदरा पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणाची प्रदीर्घ चौकशी केली. त्यानंतर खान यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :fraudधोकेबाजीEducationशिक्षण