शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील डॉक्टरांची फसवणूक; मुलीची एमबीबीएसला ऍडमिशन करून देण्याची थाप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 21:07 IST

Nagpur News पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याच्या मुलीची एमबीबीएसला ऍडमिशन करून देतो, अशी थाप मारून येथील एका टोळीने त्यांचे ४१ लाख रुपये हडपले.

ठळक मुद्दे४१ लाख रुपये हडपले

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - पुण्यातील डॉक्टर दाम्पत्याच्या मुलीची एमबीबीएसला ऍडमिशन करून देतो, अशी थाप मारून येथील एका टोळीने त्यांचे ४१ लाख रुपये हडपले. आरोपींची ठगबाजी लक्षात आल्यानंतर गुरुवारी संबंधित महिला डॉक्टरने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. (Fraud of doctors in Pune; Girl's admission to MBBS)

शिल्पा सुरेश ढेकळे (वय ४४) असे फसगत झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. पुण्याच्या नाशिक मार्गावर गुलविहार कॉलनीत त्या राहतात. विशेष म्हणजे त्यांचे पतीही डॉक्टर आहेत. मुलीला एमबीबीएसला प्रवेश मिळावा म्हणून त्या दोन वर्षांपासून प्रयत्नशिल आहेत. आरोपी सचिन कश्यप याने ७ सप्टेंबर २०१९ ला त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. नंतर मुलीच्या ऍडमिशनचा विषय असल्याने कश्यप सोबतच श्रीकांत, साखरे आणि चंद्रशेखर आत्राम यांच्याशी डॉ. शिल्पा ढेकळे यांचा ऑनलाईन संपर्क आला. प्रारंभी केरळला आणि नंतर नागपुरातील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये तुमच्या मुलीची एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला ऍडमिशन करून देतो, अशी बतावणी या भामट्यांनी केली. त्यांना नागपुरात बोलविले. नंतर प्रवेश प्रकियेतील वरिष्ठांशी मित्रत्व असल्याची आणि प्रत्यक्ष संबंध असल्याचे भासवून डॉ. ढेकळेंना जाळ्यात ओढले.

आरोपींच्या थापेबाजीला बळी पडून डॉ. ढेकळे यांनी सप्टेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत चक्क ४१ लाख रुपये दिले. रक्कम घेतल्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या नावाखाली ईकडे तिकडे फिरवून आरोपींनी टाईमपास केला. वेळोवेळी विसंगत माहिती देऊन आरोपी टाळाटाळ करू लागल्याने त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी संबंधितांकडे चाैकशी केल्याने आरोपींची ठगबाजी त्यांच्या लक्षात आली.

 

मुलीची ऍडमिशन होणार नाही, असे वाटू लागल्याने डॉ. ढेकळे यांनी आपली रक्कम त्यांना परत मागितली. मात्र, रक्कम देण्याच्या नावाखालीही बरीच टाळाटाळ केल्यानंतर आरोपींनी ढेकळे यांच्याशी सचिन, श्रीकांत आणि साखरेने संपर्क तोडला. आत्राम नुसतीच थापेबाजी करू लागला. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ढेकळे यांनी गुरुवारी सायंकाळी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार विजय तलवारे यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

ऑन रेकॉर्ड एकच लाखविशेष म्हणजे, ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आरोपींनी पैसे आधीच लागेल, असे सांगितले होते. त्यानुसार, डॉ. ढेकळे यांनी प्रारंभी एक लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. नंतर आरोपींनी सांगितल्याप्रमाणे नागपुरातील मेडिकल चाैकात येऊन स्वताच्या कारमध्ये ४० लाख रुपये रोख स्वरूपात दिले.

टॅग्स :fraudधोकेबाजी