नागपूर : तातडीने आधार कार्ड अपडेट केले नाही तर तुमचे बँक अकाऊंट बंद होईल, असा धाक दाखवून सायबर गुन्हेगारांनी एका व्यक्तीच्या खात्यातून ९९ हजार, ३१२ रुपये काढून घेतले.
प्रशांत शाम गडपायले (वय ५०)
असे तक्रारदाराचे नाव आहे.
ते चंदननगर मधील विनायक अपार्टमेंटमध्ये राहतात. १६ नोव्हेंबरला दुपारी १२ च्या सुमारास त्यांना फोन आला. आरोपीने बँकेतून बोलत आहो, असे सांगितले. तुमच्या आधार कार्डला अपडेट करायचे आहे, असे सांगून बँक खात्याची माहिती घेतली आणि गडपायले त्यांच्या खात्यातून ९९,३१२ रुपये काढून घेतले. ही बाब लक्षात आल्यानंतर गडपायले यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. इमामवाडा पोलिसांनी गुरुवारी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
-----
विष पिऊन आत्महत्या
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतिनगरात राहणारे रोशन भास्कर खिरे (२८) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.
वाठोडा पोलिसांनी गुरुवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली. रोशनच्या आत्महत्या मागचे कारण शोधले जात आहे.
-----
कळण्यातील तरुणीचा मृत्यू
नागपूर : कळमना पोलीस चौकी समोरच्या प्रतिभा कॉलनीत राहणारी स्वप्ना सदाशिव मराठे (वय २१) हिचा बुधवारी आकस्मिक मृत्यू झाला. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
----