शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ताजश्री होंडाच्या व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 00:24 IST

वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी रोख रक्कम देऊनही त्यांच्या नावे खासगी कंपनीचे कर्ज काढून पावणेदोन लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी ताजश्री होंडाच्या व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तीन वर्षांपूर्वीची ही बनवाबनवी आता उघड झाली, हे विशेष!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहन खरेदीसाठी ग्राहकांनी रोख रक्कम देऊनही त्यांच्या नावे खासगी कंपनीचे कर्ज काढून पावणेदोन लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी ताजश्री होंडाच्या व्यवस्थापकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तीन वर्षांपूर्वीची ही बनवाबनवी आता उघड झाली, हे विशेष!संदीप गोहारीकर असे आरोपीचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ताजश्री होंडा शोरूममध्ये व्यवस्थापक आहे. अमृता अशोक कर्डक (वय २१, रा. मानेवाडा) या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, अमृताने ७ सप्टेंबर २०१९ ला दुचाकी विकत घेतली होती. रोख रक्कम देऊनही आरोपी गोहारीकर याने अमृताच्या नावे निर्मल उज्ज्वल बँक कामठी येथे खाते उघडले. त्या कागदपत्रांवर अमृताच्या बनावट सही करून दुचाकीवर कर्ज काढून ती रक्कम हडपली. त्याचप्रमाणे वैशाली संजय बारापात्रे आणि कल्पना सतीश यादव यांनी सुद्धा रोख रक्कम देऊन तेथून दुचाकी विकत घेतली होती. मात्र आरोपी गोहारीकर याने बारापात्रे आणि यादव यांच्या दुचाकीवर खासगी कंपनीचे कर्ज प्रकरण तयार केले आणि तिघींच्या नावे एकूण १ लाख ७३ हजार ९३६ रुपये उचलले. दरम्यान, कर्जाचे हप्ते थकल्यामुळे त्यांना वारंवार पत्रे येऊ लागली. त्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला. अमृता हिने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्­वर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शुक्रवारी या प्रकरणात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी