लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपटलावरील अस्पष्ट जाणिवांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’. १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होतो व तरुणाई वर्षभर याची चातकासाठी प्रतीक्षा करत असते. प्रेमदिवसाला अजून आठवडाभराचा अवधी असला तरी गुरुवारपासूनचे दिवस हे प्रेमानेच भारलेले राहणार आहेत. जिवलगाचा प्रत्यक्ष होकार मिळविताना कुठलाही धोका नको म्हणून आधीपासून वातावरण निर्मितीसाठी ‘व्हॅलेंटाईन विक’ ही संकल्पना जन्माला आली. आठवडाभर चालणारा हा प्रेमाचा अमूर्त उत्सव गुरुवारपासून सुरु होत आहे.‘व्हॅलेंटाईन वीक’चा पहिला मान हा प्रेमाचा सुगंध पसरविणाऱ्या गुलाबालाच आहे. गुरुवार हा जगभरात ‘रोझ डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. प्रेमाच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तरुणाई आपल्या जिवलगांवर लाल-पिवळ्या गुलाबांची उधळण करणार आहे.तसे पाहिले तर ‘व्हॅलेंटाईन’ या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रेमाचा संदेश पाठविणारा मंत्र किंवा भेटकार्ड. मग ते आईवडिलांपासून बहीण-भावंडे, मित्र-मैत्रिणी कुणालाही पाठविलेला असो, प्रेमभावनेच्या ऊर्जेचा अपव्यय न होता जीवनप्रवाह अधिक चांगला होण्यासाठी याचा उपयोग व्हायला हवा, मनाच्या प्रीतीपाकळ्या अलगदपणे उलगडत जात असताना त्या चुरगळल्या जाणार नाहीत, याचा विश्वास पक्का व्हायला हवा. आपल्या सहवासाला व कृतीत पावित्र्य असल्याची खात्री असायला हवी, यातून जवळीक वाढावी, स्नेहबंध जुळावेत आणि एका उदात्त, पवित्र भावबंधनाचे नाते निर्माण व्हावे. हाच खरा ‘व्हॅलेंटाईन वीक’चा संदेश आहे.‘रोझ डे’ला प्रियकर-प्रेयसी प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना लाल गुलाबाचे फूल देतात. तर मैत्री किंवा अन्य नात्यांमध्ये रंग भरण्यासाठी पांढरे आणि पिवळ्या रंगाचे गुलाब दिले जातेकोणत्या रंगाचे गुलाब कुणाला द्यावे
- पिवळे गुलाब : मित्र-मैत्रिणींसाठी
- नारिंगी गुलाब : ज्या व्यक्तीकडे आपल्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत तिच्यासाठी
- पांढरे गुलाब : ज्या व्यक्तीला आपण दुखावले आहे, तिला सॉरी म्हणण्यासाठी
- लाल गुलाब : प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी
असा असेल ‘व्हॅलेंटाईन वीक’७ फेब्रुवारी - रोझ डे८ फेब्रुवारी - प्रपोज डे९ फेब्रुवारी - चॉकलेट डे१० फेब्रुवारी - टेडी डे११ फेब्रुवारी - प्रॉमिस डे१२ फेब्रुवारी - किस डे१३ फेब्रुवारी - हग डे१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे