शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाच प्रकल्पांना फोरस्टार रेटिंग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 22:53 IST

हरित इमारतीच्या संकल्पनेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २५ इमारतींचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी ५ इमारत प्रकल्पांना फोरस्टार रेटिंग तर ९ इमारत प्रकल्पांना थ्री स्टार रेटिंग देण्यात आले आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

ठळक मुद्देदहाव्या ग्रीह परिषदेत अभियंत्यांचा सत्कारस्टार रेटिंगमध्ये २५ इमारतींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हरित इमारतीच्या संकल्पनेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २५ इमारतींचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी ५ इमारत प्रकल्पांना फोरस्टार रेटिंग तर ९ इमारत प्रकल्पांना थ्री स्टार रेटिंग देण्यात आले आहे. केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रीह कौन्सिल तसेच द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट (टेरी) यांच्या संयुक्त विद्यमाने दहाव्या रिजनल ग्रीह कौन्सिलचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अनिल सगने, ग्रीह कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ, मुख्य अभियंता उल्हास देबडवार आदी उपस्थित होते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘फोर स्टार रेटिंग’ मध्ये समावेश करण्यात आलेल्या इमारतीमध्ये नागभवन, फॅमिली कोर्ट, बांधकाम भवन परिसरातील मुख्य अभियंता कार्यालय, उपमुख्य वास्तुविशारद यांचे कार्यालय तसेच राष्ट्रीय महामार्ग अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयाचा समावेश आहे. हरित इमारतीचा थ्री स्टार दर्जा मिळालेल्या बांधकाम प्रकल्पामध्ये रविभवन, हैदराबाद हाऊस, न्यू हैदराबाद हाऊस, विधान भवन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील टी.बी. हॉस्पिटलचा स्कीन वॉर्ड, आयुर्वेदिक महाविद्यालयाची इमारत, मनोरुग्णालयाची प्रशासकीय इमारत, राजभवन, संत मुक्ताबाई गर्ल्स होस्टेल या नऊ इमारतीचा समावेश आहे.हरित इमारत संकल्पना साकार केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चे उपअभियंता चंद्रशेखर गिरी, शाखा अभियंता राजेंद्र्र बारई तसेच रविभवन येथील शाखा अभियंता अजय पाटील यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.हरित इमारतीच्या टू स्टार रेटिंगमध्ये जिल्हा न्यायालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ई.एस.आय.एस. चे हॉस्पिटल, कलेक्टर ऑफिस, प्रियदर्शिनी महिला वसतिगृह, अधीक्षक अभियंता व्हिजिलन्स अ‍ॅन्ड क्वॉलिटी कट्रोल ऑफिस, विभागीय आयुक्त कार्यालय तसेच प्रशासकीय इमारत क्रमांक दोनचा समावेश करण्यात आला आहे. केवळ स्टार रेटिंग असलेल्या इमारतींमध्ये अधिक सुविधा निर्माण करून दर्जा वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी पर्यावरण सक्षम बांधकाम संदर्भातील धोरण पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागnagpurनागपूर