शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या निवासाबाहेर चौघा बडतर्फ कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 14:33 IST

नागपूर महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ केलेल्या चार कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’बाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देएकाने अंगावर रॉकेल ओतून घेतले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी धर्मा पाटील आणि हर्षल रावते यांनी मंत्रालयात आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच, नागपूर महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ केलेल्या चार कर्मचाऱ्यांनी रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’बाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. सदर पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.२००२ मध्ये १७ कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. यातील सात जणांनी आत्महत्येचा इशारा दिला होता. यातील चौघे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्या करण्यासाठी निघाले होते. त्यातील एकाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. पोलिसांनी त्याला रोखले. तसेच त्याच्यासह आलेल्या इतर तीन कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी या चौघांनाही वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला.१९९३ मध्ये महापालिका प्रशासनाने विविध संवगार्तील पदांसाठी २५६ लोकांना मुलाखतीव्दारे पदभरती केली़ याच्या विरोधात भालचंद्र जोशी नामक व्यक्तीने न्यायालयात धाव घेतली़ न्यायालयाने ही भरतीप्रक्रिया स्थगित केली़ त्यावेळी किशोर डोरले महापौर होते़ १९९७ मध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापौर झाले़ याच दरम्यान भरतीप्रक्रियेवरील स्थगिती हटविण्यात आली़ परिणामी सर्व २५६ लोकांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले़ सर्वजण रुजू झाले़ हे आदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधिन राहून देण्यात आले़ साडेचार वर्षे या सर्वांनी सेवा दिली़ तोच ४ फेब्रुवारी २००२ मध्ये तत्कालिन मनपा आयुक्त टी़ चंद्रशेखर यांनी १०६ कर्मचाºयांच्या बडतर्फ आदेश जारी केले़ प्रकरण पुन्हा न्यायालयात गेले़ न्यायालयात यावर सुनावणी सुरू झाली़ न्यायालयाच्या आदेशानुसार तत्कालिन नासुप्र सभापती मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्व १०६ कर्मचाऱ्यांची सुनावणी घेतली़ मात्र त्यांचा टी़ चंद्रशेखर यांना अनुकूल असाच अहवाल आला़ परिणामी बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना कोणताच दिलासा मिळाला नाही़ यानंतर हे बडतर्फ कर्मचारी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे गेले़ त्यांनी त्यावेळचे सचिव टी़ बेंजामिन यांच्याकडे प्रकरण सोपविले़ त्यांनी चंद्रशेखर यांचा आदेश रद्द केला़ तत्कालिन सत्तापक्षनेते प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेत एक समिती तयार करण्यात आली़ समितीने या सर्व १०६ कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याबाबतचा अहवाल दिला़ तर त्यावेळी आयुक्त पदावर असणाऱ्या संजीव जयस्वाल यांनी तो अहवाल लागू करण्याऐवजी तो सरकारला पाठविला़ यानंतर सरकारच्या आदेशानुसार १०६ पैकी ८९ कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले़ तर १७ कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे त्यांना नियुक्ती आदेशच देण्यात आले नव्हते़ या १७ कर्मचाऱ्यांनी केस मागे घेतल्यानंतरही त्यांना दिलासा देण्यात आला नाही़ पुन्हा प्रकरण न्यायालयात गेले़ यानंतर न्या़ वासंती नाईक यांनी आदेश देत ३ महिन्यात या प्रकरणात निर्णय घेण्यास सांगितले़ मात्र अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही़ त्यामुळे या बडतर्फ कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा इशारा दिला होता.

टॅग्स :AccidentअपघातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस