शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार फ्लेक्स, दीड हजार बॅनर्स काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 11:40 IST

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्यात ४८ फ्लाईंग स्क्वॉड तसेच ३६ चेकपोस्ट तैनात करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविधानसभा मतदारसंघनिहाय विशेष पथके तैनातजिल्हा प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय जिल्ह्यात ४८ फ्लाईंग स्क्वॉड तसेच ३६ चेकपोस्ट तैनात करण्यात आले आहे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करताना सुमारे ५ हजार ४०० फ्लेक्स व बॅनर्स काढण्यात आले आहेत.जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघात पारदर्शकपणे निवडणुका पार पाडताना आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर आचारसंहिता कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षामध्ये विधानसभा मतदार संघनिहाय दररोज आचारसंहितेसंदर्भातील सर्व तक्रारींची तात्काळ दखल घेण्यात येत असून फ्लाईंग स्क्वॉड तसेच चेकपोस्टच्या माध्यमातूनही संपूर्ण जिल्ह्यात २४ तास अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय चार फ्लाईंग स्क्वॉड व तीन चेकपोस्ट तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. जिल्ह्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे त्याचा भंग होणार नाही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक