शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरबाधित मुलांसोबत घालविले सुखाचे चार क्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 20:22 IST

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत अडकलेली बच्चेकंपनी रुग्णालयातच होळी मिलन कार्यक्रमात रमली. या मुलांच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण घालताना मेडिकलच्या कॅन्सर विभागाने त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे फुलण्याची संधी दिली. विभागातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्याशी ही मुले खेळताना हळूवार भाविनक नातेही जुळले. या कार्यक्रमाने जगण्याच्या उमेदीचे बळ मिळाले.

ठळक मुद्देरुग्णांसोबत डॉक्टर खेळले होळी : मेडिकलच्या कॅन्सर विभागाचा स्तुत्य उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराच्या मगरमिठीत अडकलेली बच्चेकंपनी रुग्णालयातच होळी मिलन कार्यक्रमात रमली. या मुलांच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण घालताना मेडिकलच्या कॅन्सर विभागाने त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे फुलण्याची संधी दिली. विभागातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांच्याशी ही मुले खेळताना हळूवार भाविनक नातेही जुळले. या कार्यक्रमाने जगण्याच्या उमेदीचे बळ मिळाले.गगन भरारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, जीविका फाऊंडेशन, नागपूरच्यावतीने मेडिकलच्या रेडिएशन थेरपी आणि ऑन्कोलॉजी विभाग व कॅनकिडस् किडस्कॅन फाऊंडेनशनच्यावतीने कॅन्सरग्रस्त मुलांसाठी होळी मिलनचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या मुलांना रंगीबेरंगी टोप्या घालून गुलाल लावण्यात आला. त्यांच्यासाठी विविध खेळांचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. कृष्णा कांबळे, विभागप्रमुख डॉ. अशोक दिवाण, कविता ढाक, वैशाली चव्हाण, वर्षा पाटील, आशिष खडके उपस्थित होते.यावेळी डॉ. कांबळे म्हणाले, चिमुकल्या वयात कॅन्सरचे दुखणे सोसावत असताना नाउमेद होत असलेले मन, तोच तो औषधांचा दर्प, यातच त्यांचे हरवत चालले बालपण याच जाणिवेतून काही वेळासाठी का होईना या कार्यक्रमामधून त्यांना वेगळ्या विश्वात नेले. त्यांच्यामध्ये जगण्याचा आत्मविश्वास निर्माण केला.डॉ. दिवाण म्हणाले, घरात आधीच दारिद्र्य त्यात चिमुकल्याला जडलेला कॅन्सर. उपचार करण्याची परिस्थिती नसताना ते संघर्ष करीत आहेत, पण दारिद्र्यासमोर अनेकांचे प्रयत्न थिटे पडतात. यावर उपाय म्हणून या चिमुकल्यांच्या उपचारााठी त्यांना कुणी दत्तक घेतले तर चिमुकल्यांना नवजीवन मिळण्यास मदत होईल. चिमुकल्याला जगविण्याची पालकांची चिंता कमी होईल. अकाली होणारी ही कोवळी पानगळ थांबेल, असेही ते म्हणाले. यावेळी सहभागी मुलांना गाठी व भेटवस्तू देण्यात आल्या.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पूजा बान्ते, पूजा, प्रियंका, रंजिता आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :cancerकर्करोगHoliहोळी