शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या खात्यातून साडेचार लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 22:13 IST

सायबर गुन्हेगाराने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या खात्यातून चक्क साडेचार लाख रुपये आॅनलाईन वळते करून घेतले. ५ नोव्हेंबरला घडलेल्या या खळबळजनक प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर सेलने त्याचा तपास केला. त्यानंतर गुरुवारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देसायबर गुन्हेगाराची बनवाबनवीनागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीची चौकशी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सायबर गुन्हेगाराने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या खात्यातून चक्क साडेचार लाख रुपये आॅनलाईन वळते करून घेतले. ५ नोव्हेंबरला घडलेल्या या खळबळजनक प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर सेलने त्याचा तपास केला. त्यानंतर गुरुवारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.विकास श्रीधर शिरपूरकर (वय ७२) हे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश होय. धरमपेठमधील देवालय, खरे टाऊन येथे ते राहतात. त्यांच्या मोबाईलवर ५ नोव्हेंबरला सकाळी ८४२०० ७९७७६ क्रमांकाच्या मोबाईलवरून फोन आला. पलिकडून बोलणाऱ्याने मी एसबीआयच्या दिल्ली मुख्यालयात व्यवस्थापक आहोत. आपले नाव राकेश वर्मा आहे, असे त्याने सांगितले. तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड एक्स्पायर होत आहे. त्यामुळे नवीन कार्ड मिळवण्यासाठी (रिनिवल करण्यासाठी) माहिती सांगा, असे म्हणत आरोपीने त्यांच्याकडून कार्डची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर शिरपूरकर यांच्या मोबाईलवर ओटीपी नंबर आला. तो विचारून शिरपूरकर यांच्या विविध बँक खात्यातून आरोपीने ४ लाख, ४९ हजार, ७६० रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिरपूरकर यांनी स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला. चक्क निवृत्त न्यायाधीशाच्या बँक खात्यावरच सायबर गुन्हेगाराने डल्ला मारल्याने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या सायबर सेलने सुरू केला. प्रदीर्घ तपासानंतर या प्रकरणात गुरुवारी हात घातल्याने सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली कलम ४२०, ४१९ तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६६ (सी) अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी