शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

चारही मतदान सक्तीचे

By admin | Updated: February 8, 2017 02:49 IST

महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला आता चार मतदान करावेच लागणार आहे.

अन्यथा अधिकारी दाबणार ‘नोटा’ : इव्हीएमला यावेळी ‘एण्ड कॅप’ नाही कमलेश वानखेडे   नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला आता चार मतदान करावेच लागणार आहे. निवडणूक आयोगाने इव्हीएमच्या रचनेत बदल केला असून, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दाबण्यात येणारी ‘एण्ड कॅप’ची बटनच रद्द केली आहे. त्यामुळे एखाद्या मतदाराने फक्त तीनच मतदान केले तर मतदानाची प्रक्रियाच पूर्ण होणार नाही. अशा परिस्थितीत उमेदवाराला चौथे मत द्यायचे नसल्यास त्याला ‘नोटा’ बटन दाबावेच लागेल. मतदाराने तसे न केल्यास निवडणूक अधिकारी मतदारासमक्ष स्वत: नोटाचे बटन दाबतील. कायद्याने निवडणूक अधिकाऱ्यांना तसा अधिकार देण्यात आला आहे. महापालिकेची गेली निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीने झाली. एका प्रभागात दोन मते द्यायची होती. समजा एखाद्या प्रभागातील एका बूथवर एकूण १०० मतदान झाले तर ‘अ’ जागेवर लढणाऱ्या एकूण उमेदवारांच्या मतांची बेरीज १०० यायला हवी. ५६ पेक्षा जास्त उमेदवार झाल्यास तांत्रिक अडचण एका इव्हीएमवर जास्तीत जास्त १६ बटन असतात. यापैकी एक जागा संवर्गाच्या पट्टीसाठी तर शेवटची जागा ‘नोटा’ बटनसाठी सोडली जाते. त्यामुळे एका मशीनवर १४ उमेदवारांची नावे येऊ शकतात. एका कंट्रोल युनिटला फक्त चार मशीन जोडल्या जाऊ शकतात. त्यामुळे एकूण ५६ उमेदवारांची नावे एका कंट्रोल युनिटवर येऊ शकतात. एखाद्या प्रभागात चार जागांसाठी एकूण ५६ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असतील तर मात्र तांत्रिक अडचण निर्माण होणार आहे. एकाच कंट्रोल युनिटवर पाचवी मशीन जोडणे शक्य नसल्यामुळे दुसरे स्वतंत्र कंट्रोल युनिट लावावे लागणार आहे. तसे झाले तर मतदान प्रक्रिया आणखी किचकट होईल व निवडणूक अधिकाऱ्यांसह मतदारांचीही डोकेदुखी वाढेल.