शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात क्रिकेट बेटिंग करणारे चार बुकी जेरबंद : दोन ठिकाणी छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 23:58 IST

आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या दोन अड्ड्यावर मानकापूर आणि यशोधरानगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापे घातले. पोलिसांनी या दोन अड्ड्यावरून ५ बुकींना जेरबंद केले.

ठळक मुद्देमानकापूर, यशोधरानगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या दोन अड्ड्यावर मानकापूर आणि यशोधरानगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापे घातले. पोलिसांनी या दोन अड्ड्यावरून ५ बुकींना जेरबंद केले. तर त्यांचा एक साथीदार फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आयपीएल सुरू होताच नागपुरातील बुकी आपल्या हस्तकांच्या माध्यमातून जागोजागी क्रिकेट सटट्याची खयवाडी करण्यासाठी अड्डे सुरू करतात. या अड्ड्यावरून लाखो रुपयांची रोज खयवाडी केली जाते. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारच्या क्रिकेट सट्ट्याचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर मानकापूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास एमबी टाऊनमधील गणपती नगरात छापा घातला. येथे मयूर राजकुमार अहिर, निहाल शैलेंद्र जोशी आणि अंकित मुरली माहेश्वरी हे तीन बुकी फोनवरून दिल्ली कॅपिटलविरुद्ध चेन्नई सुपर किंग या क्रिकेट मॅच वर सट्याची खयवाडी करत होते. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एलईडी टीव्ही, चार मोबाईल आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू, सहाय्यक आयुक्त रेखा भवरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूरचे ठाणेदार गणेश ठाकरे, उपनिरीक्षक कैलास मगर, हवालदार रवींद्र भुजाडे, नायक अंकुश राठोड, अजय पाटील आणि शिपाई रोशन वाडीभस्मे यांनी ही कामगिरी बजावली. त्याचप्रमाणे यशोधरानगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री राजीव गांधी नगरातील एका अड्ड्यावर छापा मारला. तेथे अझरुद्दीन जहरुद्दीन काझी आणि आवेश साबीर खान हे दोन बुकी क्रिकेट सट्टा घेताना दिसले. आपल्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडल्याची कुणकूण लागताच त्यांचा तिसरा साथीदार आरोपी सोनू मलिक हा पळून गेला. पोलिसांनी अड्ड्यावरून मोबाईल, टीव्ही तसेच सट्ट्याचे साहित्य जप्त केले. पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक आयुक्त परशुराम कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमाकांत दुर्गे, उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, हवालदार मनीष भोसले, शोएब शेख, राज कुमार पाल आणि प्रसेंजित जांभूळकर यांनी ही कामगिरी बजावली.बडे मासे सेफ !नागपुरात क्रिकेट सट्ट्याची कोट्यवधी रुपयांची खयवाडी करणारे अनेक मोठे बुकी, फिक्सर आहेत. त्यातील काहींनी आपले बस्तान नागपूर शहराच्या सीमेवर मौदा, भंडारा जिल्ह्यात आणि बुटीबोरीकडे वर्धा जिल्ह्यात बसविले आहे. या ठिकाणाहून ते आपल्या साथीदाराच्या माध्यमातून रोज कोट्यवधीची खायवाडी करून घेत आहेत. त्यांचे काही दलाल त्यांना पोलिसांच्या कारवाईपासून दूर ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. सेटिंगबाज बड्या बुकीवर कारवाई होताना दिसत नाही. पोलीस छुटपूट बुकींवर कारवाई करून आपली पाठ थोपटून घेतात.

टॅग्स :raidधाडCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी