शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण करणारे चार गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 01:24 IST

हुडकेश्वरमधील शारदा चौकात गणेश विसर्जनाच्या वेळी महापालिका कर्मचारी नीलेश हाथीबेड (वय ३४, रा. ठक्करग्राम, पाचपावली) याला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी चौघांना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी विक्की ठाकूर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

ठळक मुद्देमुख्य आरोपी विक्की ठाकूर फरारच : पोलिसांची शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वरमधील शारदा चौकात गणेश विसर्जनाच्या वेळी महापालिका कर्मचारी नीलेश हाथीबेड (वय ३४, रा. ठक्करग्राम, पाचपावली) याला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींपैकी चौघांना पोलिसांनी अटक केली. मुख्य आरोपी विक्की ठाकूर मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.गणेश विसर्जनासाठी जागोजागी कृत्रिम टँक बनविण्यात आले होते. त्यातील माती काढून नेण्यासाठी महापालिकेने वाहन ठेवले होते. अशाच एका वाहनावर चालक म्हणून कार्यरत असलेला नीलेश शारदा चौकातील टँकजवळ बसून होता. हनुमाननगर झोनच्या सभापती आणि नगरसेविका रुपाली ठाकूर यांचा दीर विक्की ठाकूर तेथे आला. त्याने नीलेशला तातडीने तेथून वाहन काढण्यास सांगितले. थोडा विलंब झाल्याने संतप्त झालेल्या विक्की आणि त्याच्या साथीदारांनी नीलेशला बेदम मारहाण करून जबर जखमी केले. दोष नसताना नीलेशला मारहाण करणाºया विक्की तसेच त्याच्या साथीदारांची गुंडगिरी अनेकांनी बघितली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला. महापालिका कर्मचाऱ्यांना ही बाब कळताच त्यांनी या घटनेचा निषेध करून गुंडगिरी करणाऱ्या विक्की आणि साथीदारांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, नीलेशच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी जुजबी कलमा लावून प्रकरण निस्तरण्याचे प्रयत्न केले. शारदा चौकातील एका सीसीटीव्हीमध्येही ही गुंडगिरी कैद झाली. मात्र, कर्मचाºयांनी हे प्रकरण लावून धरले. त्यामुळे पोलिसांनी कारवाईसाठी धावपळ चालवली. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी तिघांना तर शनिवारी एकाला अशा प्रकारे चौघांना अटक करण्यात आली. मुख्य आरोपी विक्कीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले नाही.कुठे लपला विक्की ?आरोपी विक्की ठाकूर कुख्यात आहे. वहिनी नगरसेविका असली तरी तोच नगरसेवक असल्याच्या आविर्भावात वागतो. कर्मचाºयांनाच नव्हे तर मदत मागण्यासाठी आलेल्या गरीब नागरिकांनाही तो तोंड टाकून बोलतो. त्यांच्याशी अपमानास्पद वर्तन करतो. राजकीय पांघरुण असल्याने काही पोलीसही त्याच्या संपर्कात आहेत. तेच त्याला अटकेच्या कारवाईपासून दूर ठेवत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक