शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

मुद्रांक शुल्क कपातीनंतर चार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST

- रजिस्ट्रीद्वारे २६१.१५ कोटींचा महसूल : रजिस्ट्री वाढल्या, पण महसूल कमी मोरेश्वर मानापुरे नागपूर : राज्य शासनाच्या ३ टक्के ...

- रजिस्ट्रीद्वारे २६१.१५ कोटींचा महसूल : रजिस्ट्री वाढल्या, पण महसूल कमी

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : राज्य शासनाच्या ३ टक्के मुद्रांक शुल्क कपातीमुळे सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या चार महिन्यात वर्ष २०१९ च्या याच काळाच्या तुलनेत नागपूर शहरात रजिस्ट्री वाढल्या, पण राज्य शासनाला कमी महसूल मिळाला आहे.

आकडेवारीनुसार सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ या काळात ६ टक्के मुद्रांक शुल्क आकारणीनंतर २३,२२० रजिस्ट्री झाल्या आणि त्याद्वारे ३०७ कोटी १४ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. तुलनात्मकरीत्या सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या काळात ३ टक्के मुद्रांक शुल्क आकारणीमुळे रजिस्ट्रीची आकडेवारी वाढून ३८,०९८ वर गेली आणि त्याद्वारे २६१ कोटी १५ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. दोन वर्षांतील आकडेवारी पाहता २०१९ मध्ये रजिस्ट्री कमी झाल्या, पण महसूल जास्त मिळाला तर २०२० मध्ये रजिस्ट्री वाढल्या, पण महसूल कमी मिळाल्याचे आकडेवारीत दिसून येते. केवळ डिसेंबर २०२० ची आकडेवारी पाहिल्यास ३ मुद्रांक शुल्क कपातीमुळे नागपूर शहरात तब्बल १४,८८५ रजिस्ट्री झाल्या आणि त्याद्वारे १०३ कोटींचा महसूल मिळाला. त्या तुलनेत डिसेंबर २०१९ मध्ये ६,६९५ रजिस्ट्री होऊन ७२ कोटींचा महसूल मिळाला होता.

चार महिन्यात २६१.१५ कोटींचा महसूल

कोरोनाच्या महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात मंदीचे वातावरण आले होते. या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यााठी क्रेडाई महाराष्ट्र मेट्रोने मुद्रांत शुल्कात कपात करण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने ३ टक्के कपात केली. त्यानंतर म्हणजेच सप्टेंबर महिन्यात या क्षेत्रात उत्साह संचारला आणि रजिस्ट्रीची आकडेवारी वाढली. चार महिन्यातच ३८,०९८ रजिस्ट्री झाल्या. गेल्यावर्षीच्या अखेरच्या डिसेंबर महिन्यात सर्वच मुद्रांक नोंदणी कार्यालयात गर्दी वाढली आणि १४,८८५ सर्वाधिक रजिस्ट्री झाल्या. त्यातून राज्य शासनाला २६१ कोटींचा महसूल मिळाला. जानेवारीपासून मुद्रांक शुल्कात २ टक्के कपात असल्याने रजिस्ट्री वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कोरोना काळात नियमांचे उल्लंघन

तीन टक्के कपातीनंतर रजिस्ट्रींची संख्या वाढली. त्यानुसार कार्यालयात ग्राहक, बिल्डर्स आणि डेव्हलपर्सची गर्दी होऊ लागली. डिसेंबर महिन्यात प्रत्येक जण मुद्रांक शुल्क कपातीचा फायदा घेण्यासाठी येऊ लागले. कार्यालयाने गर्दी टाळण्यासाठी टोकण पद्धत अवलंविली. पण ऑनलाईन रजिस्ट्री नोंदणीसाठी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे प्रत्येकाला रजिस्ट्रीसाठी उशीर होऊ लागला. त्यामुळे दरदिवशी गर्दी वाढत गेली आणि कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होऊ लागले. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

डिसेंबर महिन्यातील खरेदी-विक्रीचे व्यवहार ३८,०९८

मुद्रांक शुल्क कपातीमुळे नागपूर शहरात रजिस्ट्री वाढल्या. अखेरच्या महिन्यात तब्बल १४,८८५ रजिस्ट्री झाल्या आणि त्याद्वारे १०३ कोटींचा महसूल मिळाला. यंदा कोरोनामुळे शासनाने नागपूर शहराचे मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट ४३० कोटींवर आणले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ९० टक्क्यांपेक्षा जास्त उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. अर्थात ९ महिन्यात ४१०.१० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. मार्च महिन्यापर्यंत उद्दिष्टांपेक्षा जास्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

- अशोक उघडे, सह जिल्हा निबंधक वर्ग-१ (उच्च श्रेणी) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर शहर.

अशी आहे मुद्रांक शुल्क कपात

सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रीवर एकूण ६ टक्के मुद्रांक शुल्क लागायचे. त्यात ५ मुद्रांक शुल्क व १ टक्के अधिभार लागायचा. पण बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अधिभार रद्द केला आणि मुद्रांक शुल्कात २ टक्के कपात अर्थात एकूण ३ टक्के कपात केली होती. उदा. ३० लाखांच्या फ्लॅट खरेदीवर ग्राहकांना ९० हजारांचा फायदा झाला आहे. जानेवारीनंतर मुद्रांक शुल्कात २ टक्के कपातीचा फायदा मिळत आहे.

वर्ष २०१९ महिनानिहाय दस्त (६ टक्के मुद्रांक शुल्क)

नोंदणी व मुद्रांत शुल्क (कोटीत)

महिना दस्त मुद्रांक

सप्टेंबर ५३५० ५५.६४

ऑक्टोबर ५४२९ ६५.५०

नोव्हेंबर ५७४६ ७०.४४

डिसेंबर ६६९५ ७२.००

एकूण २३२२० ३०७.१४

वर्ष २०२० महिनानिहाय दस्त (३ टक्के मुद्रांक शुल्क)

नोंदणी व मुद्रांत शुल्क (कोटीत)

महिना दस्त मुद्रांक

सप्टेंबर ६५७१ ४०.७०

ऑक्टोबर ८३४२ ६१.२७

नोव्हेंबर ८३०० ५६.१८

डिसेंबर १४८८५ १०३

एकूण ३८०९८ २६१.१५