शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

नागपुरात माजी सरपंचाच्या मुलाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 23:20 IST

कामठी क्षेत्रातील तरोडीचे माजी सरपंच कृष्णा हरिणखेडे यांच्या नरेंद्र नामक मुलाची हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये लपविण्यात आला. अवैध संबंधातून हे थरारक हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून पुढे आली असून, याप्रकरणी मध्य प्रदेशातील दिनेश कुंवर मौर्य नामक तरुणाला अटक करण्यात आली. तर मुख्य आरोपी रूपसिंग ऊर्फ किशन सोळंकी आणि त्याची पत्नी फरार आहे.

ठळक मुद्देअनैतिक संबंधातून घडला थरारमुख्य आरोपी पत्नीसह फरार, साथीदार गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :कामठी क्षेत्रातील तरोडीचे माजी सरपंच कृष्णा हरिणखेडे यांच्या नरेंद्र नामक मुलाची हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये लपविण्यात आला. अवैध संबंधातून हे थरारक हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून पुढे आली असून, याप्रकरणी मध्य प्रदेशातील दिनेश कुंवर मौर्य नामक तरुणाला अटक करण्यात आली. तर मुख्य आरोपी रूपसिंग ऊर्फ किशन सोळंकी आणि त्याची पत्नी फरार आहे.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रूपसिंग सोळंकी आणि त्याची पत्नी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिरोडी शिवारात एका डेअरी फार्ममध्ये काम करतात. बाजूलाच नरेंद्र हरिणखेडे शेतावर जात होता. त्याचे डेअरी फार्मवरही जाणे-येणे होते. त्यातून त्याची रूपसिंगच्या पत्नीसोबत मैत्री झाली. त्याची कुणकुण लागल्याने अनेक दिवसांपासून रूपसिंग पाळतीवर होता. सोमवारी रात्री नरेंद्र हरिणखेडे डेअरी फार्मवर आला. तो बाजूलाच राहणाऱ्या रूपसिंगच्या घरात गेला. तेथे रूपसिंगच्या पत्नीसोबत तो बसला असताना बाजूलाच दडून बसलेला रूपसिंग तेथे आला. त्याने पत्नीसोबत खेटून बसलेल्या नरेंद्रसोबत भांडण सुरू केले. वाद विकोपाला गेल्यानंतर रूपसिंगने नरेंद्रवर हल्ला चढवला. त्याला जागीच ठार केले. यावेळी रात्रीचे ११ वाजले होते. आरोपीने त्याचा मित्र कुंवर मौर्य याला बोलवून त्याच्या मदतीने नरेंद्रचा मृतदेह एका पाईपलाईनमध्ये दडवला आणि पत्नीसह फरार झाला.असा झाला उलगडाइकडे नरेंद्र अचानक बेपत्ता झाल्याने माजी सरपंच कृष्णा हरिणखेडे यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांवर अवलंबून न राहतात हरिणखेडे कुटुंबीयांनी मित्रांसोबत नरेंद्रची शोधाशोध सुरू केली. सोमवारी दुपारी ते शोध घेत असताना नरेंद्र स्वत:च्या शेतात जाताना नेहमी डेअरी फार्मवर जायचा, अशी माहिती मिळाल्याने हरिणखेडे आणि त्यांच्या सहकाºयांनी त्या डेअरी फार्मवर धाव घेतली. तेथील काही कर्मचाऱ्यांनी नरेंद्र येथे रूपसिंग ऊर्फ किशन सोळंकी याच्या घरी जायचा, अशी माहिती दिली. तसेच रूपसिंग आणि त्याची पत्नी मीना सोमवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याचेही सांगितले. सोळंकीचा मित्र दिनेश कुंवर मौर्य याबाबत अधिक माहिती देऊ शकतो, असेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे हरिणखेडे यांनी लगेच दिनेशला शोधून विचारपूस केली. त्याने प्रारंभी असंबंद्ध माहिती दिल्याने हरिणखेडे यांच्यासोबतच्या काही जणांनी त्याचे कानशील गरम केले. त्यानंतर त्याने नरेंद्रची हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये दडवल्याची माहिती दिली.हरिणखेडे यांनी ही माहिती नियंत्रण कक्षाला कळवली. त्यानंतर नंदनवन पोलिसांना सायंकाळी ५.३० वाजता ही माहिती कळविण्यात आली. ते कळताच पोलीस उपायुक्त नीलेश भरणे नंदनवनच्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी दिनेशला विचारपूस केली. त्याने सांगितल्याप्रमाणे पाईपलाईनमधील मृतदेह बाहेर काढण्यात आला. तो नरेंद्रचाच असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना बोलवून घेतले. त्यानंतर पंचनामा आटोपून मृतदेह मेडिकलमध्ये पाठविण्यात आला.पत्नीला बदडले, मित्राला धमकीपत्नीसोबत नरेंद्रचे अनैतिक संबंध असल्याचे अनेकांनी ठामपणे सांगितल्याने रूपसिंग अस्वस्थ झाला होता. मात्र, त्याने पत्नीला त्याची जाणीव होऊ दिली नाही. तो या दोघांना रंगेहात पकडण्याच्या तयारीत होता. त्यामुळे गप्प बसला. सोमवारी रात्री नरेंद्र आणि मीनाला त्याने रंगेहात पकडल्याने तो बेभान झाला. त्याने प्रारंभी नरेंद्रवर काठीने हल्ला चढवला. डोक्यावर फटका बसल्याने तो खाली पडताच त्याने त्याला दगडाने ठेचले. त्यानंतर दोरीने गळा आवळला. हे करतानाच त्याने पत्नीलाही बदडून काढले. त्यानंतर दिनेश मौर्यला फोन केला. मीनाची प्रकृती बिघडली आहे, असे सांगून त्याला तातडीने घरी बोलवून घेतले. दिनेश पोहचला तेव्हा तेथे नरेंद्रचा मृतदेह पडून होता तर, मीना जखमी अवस्थेत वेदनांनी विव्हळत होती. ते पाहून दिनेश घाबरला. तो परत जात असल्याचे पाहून आरोपीने त्याला धमकी दिली. तू नरेंद्रचा मृतदेह लपविण्यास मदत केली नाही तर तुला या हत्याकांडात फसवेन, अशी धमकी दिली. त्यामुळे मृतदेह उचलून पाईप लाईनमध्ये कोंबण्यासाठी आपण तयार झालो, असे दिनेशने पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, हत्याकांडानंतर पत्नीसह फरार झालेल्या रूपसिंगचा पोलीस शोध घेत आहेत.

 

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर