शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
4
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
5
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
6
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
8
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
9
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
10
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
11
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
12
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
13
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
14
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
15
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
16
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
17
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
18
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
19
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
20
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी

पूर्व आरटीओ कार्यालयाला मिळणार स्वत:ची इमारत

By admin | Updated: January 26, 2016 03:23 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला गेल्या पाच वर्षांपासून स्वत:ची इमारतच नव्हती. डिप्टी सिग्नल येथील

नागपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरला गेल्या पाच वर्षांपासून स्वत:ची इमारतच नव्हती. डिप्टी सिग्नल येथील नागपूर सुधार प्रन्यासचे (नासुप्र) सभागृहात भाडे तत्त्वावर कार्यालयाचा कारभार सुरू होता. याची दखल आ. कृष्णा खोपडे यांनी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला असता मंगळवारी मुंबईत झालेल्या एका बैठकीत बांधकामासाठी ३० कोटींच्या प्रस्तावास त्यांनी परवानगी दिली. वाढते शहर, वाढती वाहने व वाढती गर्दी लक्षात घेऊन पूर्व नागपूरसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याला २४ आॅगस्ट २०११ ला मंजुरी देण्यात आली. पूर्व नागपूरकरांची ‘एम.एच. ४९’ अशी नवी ओळख निर्माण झाली. सुरुवातीपासून स्वतंत्र कार्यालयाच्या जागेसाठी प्रयत्न सुरू होते. परंतु जागेची समस्या मार्गी न लागल्यामुळे सुरुवातीला नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या तळमाळ्यावर हे कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचा पदभार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्याकडे येताच त्यांनीही आपल्या परीने स्वतंत्र जागा मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात चिखली देवस्थान, डिप्टी सिग्नल येथील पाण्याच्या टाकीजवळील नासुप्रचे सभागृह भाडे तत्त्वावर मिळण्यास यश आले. गेल्या दीड वर्षांपासून येथे कार्यभार सुरू आहे. (प्रतिनिधी)नासुप्र करणार बांधकाम४आ. खोपडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, डिप्टी सिग्नल येथील चिखली ले-आऊट येथे नासुप्रची चार एकरची जागा पूर्व आरटीओला मिळण्यासाठी बऱ्याच प्रयत्नानंतर यश आले. चार कोटी एक लाख रुपये किमत असलेल्या या जागेचे आतापर्यंत परिवहन विभागाने २ कोटी ७० लाख भरले आहे. उर्वरित १ लाख ३१ लाख रुपये भरावयाचे होते, तसेच कार्यालयाच्या हायटेक बांधकामही प्रस्तावित होते. अखेर मंगळवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ३० कोटींच्या प्रस्ताव्यास मान्यता दिली. बांधकामाची जबाबदार नासुप्रकडे देण्यात आली आहे.तीन मजली असणार इमारत४खोपडे म्हणाले, पूर्व आरटीओ कार्यालयाची ही इमारत तीन मजली असणार आहे. यासाठी २८.३८ कोटी इतका निधी नियोजित केला आहे. तळमजल्यावर प्रतीक्षा हॉल, परमिट, ट्रान्सपोर्ट, नॉन ट्रान्सपोर्ट, परवाना आदी विभाग असणार आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर रेकॉर्ड विभाग, कॉन्फरन्स हाल व आवश्यक कार्यालय असेल. पारदर्शक कामकाज ही या कार्यालयाची ओळख राहिली आहे.