शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

नागपुरात अधिवेशनाच्या बंदोबस्तात असलेल्या महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेले माजी आमदार; हुज्जतबाजी, गरमागरमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 21:31 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना हात पकडून ताब्यात घेत असलेल्या एका महिला पोलिसांच्या अंगावर यवतमाळचे माजी आमदार संदीप बाजोरिया धावून गेले. त्यांनी महिला पोलिसांवर डोळे काढून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देआंदोलनस्थळी वातावरण तणावपूर्ण

आॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना हात पकडून ताब्यात घेत असलेल्या एका महिला पोलिसांच्या अंगावर यवतमाळचे माजी आमदार संदीप बाजोरिया धावून गेले. त्यांनी महिला पोलिसांवर डोळे काढून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला.राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल पदयात्रा काढली. ही पदयात्रा नागपूर शहरात आज सकाळी दाखल झाली. नेत्यांनी सोनेगाव पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर पदयात्रा थांबवून रास्ता रोको सुरू केला. त्यामुळे नागपूर-वर्धा-चंद्रपूर महामार्गावरची वाहतूक रखडली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी वातावरण तणावपूर्ण झाले. रखडलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी आंदोलक नेत्यांना रस्ता मोकळा करण्याची विनंती केली. मात्र, नेत्यांनी दाद दिली नाही म्हणून महिला पोलिसांनी खा. सुप्रिया सुळे यांना जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी पोलिसांसोबत झटापट सुरू झाली. हात मुरळगला गेल्याने खा. सुळे यांना दुखापत झाली. तरी महिला पोलीस त्यांना जबरदस्तीने वाहनात बसविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून यवतमाळचे माजी आमदार संदीप बाजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी एका महिला पोलिसांना धमकावत तिच्या हातातून खा. सुळे यांचा हात सोडविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पोलीस आणि नेत्यांमध्ये काही वेळ गरमागरमीही झाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही नेते यांनी समंजस भूमिका घेतल्याने वातावरण शांत झाले. याप्रकरणी पोलिसांच्या कामात अडथळा केल्याच्या आरोपावरून माजी आ. बाजोरिया यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची चर्चा होती. मात्र, असा कोणताही गुन्हा रात्री ७ वाजेपर्यंत सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेला नव्हता.रुग्ण आणि नातेवाईकांची कुचंबणाहल्लाबोल पदयात्रेचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी अचानक रास्ता रोको सुरू केल्यामुळे नागपूर-वर्धा-चंद्रपूर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची तीव्र कुचंबणा झाली. चिचभवन पुलापासून मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद असल्याने आधीच वाहतुकीची कोंडी होत आहे. तशात रास्ता रोको आंदोलन सुरू झाल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्या शेकडो वाहनातील हजारो प्रवासी तसेच अ‍ॅम्बुलन्स अडकून पडल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचीही कोंडी झाली. अनेक जण रडकुंडीला आले. अ‍ॅम्बुलन्सचा मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. काही वाहनचालकांना दमदाटी करून तर काहींवर बळाचा वापर करीत पोलिसांनी अ‍ॅम्बुलन्सचा मार्ग मोकळा केला.पोलिसांतील पालक जागृतरस्ता रोकोमुळे विद्यार्थ्यांची ने-आण करणारी अनेक वाहने वाहनांच्या गर्दीत फसली. यायला-जायला काहीच जागा नसल्याने घामाघूम अवस्थेत वाहनात बसून राहण्यापलीकडे विद्यार्थी काही करू शकत नव्हते. बाहेरगावाहून नागपुरात परीक्षा देण्यासाठी आलेल्या काही परीक्षार्थ्यांचाही समावेश होता. खापरीत त्यांचे वाहन अडकले. त्यामुळे तेथून पायी चालत दोन विद्यार्थिनी आंदोलनस्थळी आल्या. सोनेगावचे ठाणेदार संजय पांडे यांना त्यांनी आपली अडचण सांगितली. पेपरची वेळ झाली. छत्रपती चौकातील संताजी महाविद्यालयात जायचे आहे अन् जायला कोणतेच वाहन नाही, असे सांगून त्या रडू लागल्या. यावेळी पांडे यांच्या बाजूला पोलीस शिपायी संजय जाधव उभे होते. त्यांनी लगेच आपली मोटरसायकल काढून त्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात पोहचवून दिले.

 

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७