शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

'या' माजी वित्तमंत्र्याचे फेसबुक अकाऊंट हॅक; त्यांच्या नावाने केली पैशाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 13:57 IST

राज्याचे माजी वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या फेसबुक अकाउंटला हॅक करून सायबर गुन्हेगाराने त्यांच्या कार्यकर्त्यांना पैशाची मागणी केली.

ठळक मुद्देकार्यकर्ता पडला चाटफेसबुक आयडी हॅक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - राज्याचे माजी वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या फेसबुक अकाउंटला हॅक करून सायबर गुन्हेगाराने त्यांच्या कार्यकर्त्यांना पैशाची मागणी केली. साहेबांकडून अगदीच किरकोळ रकमेची मागणी झाल्याने चाट पडलेल्या कार्यकर्त्याने थेट साहेबांनाच विचारणा केल्यामुळे ही बनवाबनवी उघड झाली. त्याचमुळे प्रकरण पोलिसांकडे पोहचले.माजी राज्यमंत्री मुळक सध्या नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे कार्यकर्ते आबिद काजी यांना बुधवारी रात्री ९ च्या सुमारास फेसबुकवरून एक मेसेज आला. १० हजारांची अत्यंत गरज आहे, तातडीने गुगल पे वरून पाठवा, असे म्हणत पैशाची मागणी करणाऱ्याने आपला गुगल पे चा मोबाईल नंबरही काजी यांना पाठविला. पैशाची निकड कुणालाही भासू शकते. मात्र, साहेबांकडून अगदीच किरकोळ रक्कम मागितली गेल्याने काजी चाट पडले. त्यात मोबाईल क्रमांकही मुळक यांचा नव्हता. त्यामुळे काजींनी थेट मुळक यांच्या बंगल्यावर त्यांचे निकटस्थ प्रकाश नारायण बारोकर यांना फोन करून या संबंधाने विचारणा केली. नंतर मुळक यांच्याशीही बोलणी केली. त्यानंतर हा प्रकार सायबर गुन्हेगारीचा असल्याचे आणि मुळक यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचे स्पष्ट झाले. मुळक यांनी लगेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी आबिद काजी यांची प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्यात आली.पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४१९, ५११ तसेच माहिती व तंत्रज्ञानाचे सहकलम६६ (सी) अन्वये गुन्हा दाखल केला.क्लोनिंगचा संशयसायबर गुन्हेगाराने मुळक यांचे फेसबुक अकाउंट हॅक केले की अकाउंटचे क्लोनिंग केले त्याचा पोलीस तपास करीत आहेत. शहरात अशा प्रकारच्या महिनाभरात अनेक घटना घडल्या असून खुद्द पोलीस आयुक्तांचेही फेसबुक अकाउंट हॅक करण्याची मजल सायबर गुन्हेगारांनी मारली आहे.

टॅग्स :Facebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइम