शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

मनुष्यबळ देण्याचा पडला विसर

By admin | Updated: March 29, 2016 03:52 IST

दीड लाख लोकांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन अस्तित्वात आलेल्या नवनिर्मित शांतिनगर पोलीस ठाण्याला मंजूर

नरेश डोंगरे ल्ल नागपूरदीड लाख लोकांच्या जानमालाच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन अस्तित्वात आलेल्या नवनिर्मित शांतिनगर पोलीस ठाण्याला मंजूर केलेले मनुष्यबळ देण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे. १०३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संख्याबळ मंजूर करून सुरू करण्यात आलेल्या या पोलीस ठाण्यात केवळ ३ अधिकारी आणि १२ कर्मचारीच प्रत्यक्षात काम करीत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अनेक खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणी वसुलीसह विविध गंभीर गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या वसीम चिऱ्या तसेच तिरुपती भोगे या खतरनाक गुंडांच्या टोळ्या शांतिनगरात कार्यरत आहेत. त्यांच्यासह अनेक गुन्हेगार या भागात दारू, गांजा, अफू, चरस, गर्द, जुगार अड्डे, मटका अड्डे आणि क्लब या भागात चालतात. बुकीही हायटेक अड्डे उघडून बसले आहेत. या भागात नेहमीच गंभीर गुन्हे होत असतात. तातडीने पोलीस पोहोचत नसल्यामुळे लकडगंज पोलीस ठाण्याचे विभाजन करून शांतिनगर पोलीस ठाणे कार्यान्वित करावे, अशी आग्रही मागणी या भागातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी उचलून धरली. तसा प्रस्ताव १७ मार्च २००८ ला पोलीस आयुक्तालयामार्फत शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्याला २०१० मध्ये शासनाची मंजुरी मिळाली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी वसीम चिऱ्या आणि तिरुपती भोगे या खतरनाक गुन्हेगारांनी एकमेकांच्या टोळ्यांवर भररस्त्यावर तब्बल तासभर सिनेस्टाईल गोळीबार करून थरार निर्माण केल्यामुळे शांतिनगर ठाण्याला अस्तित्वात आणण्याचे जोरात प्रयत्न सुरू झाले. रविवारी २७ मार्चला शांतिनगर ठाणे कार्यान्वित करण्याचे निश्चित झाले. गल्लत झाली...४नव्या पोलीस ठाण्याची नवी इमारत, प्रशस्त जागा आणि संगणक, वाहने अशा साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. एक ठाणेदार, दोन पोलीस निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक, नऊ उपनिरीक्षक, सात फौजदार, २२ हवालदार आणि ६० पोलीस नायक-शिपाई असे एकूण १०३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे संख्याबळही ठाण्यात पाठविण्याचे ठरले. पोलीस ठाणे सुरू होण्याच्या किमान पाच दिवसांपूर्वी हे संख्याबळ ठाण्यात रुजू व्हायला हवे होते, मात्र गल्लत झाली. पोलीस ठाणे सुरू होऊन दोन दिवस झाले. परंतु येथे ठाणेदार, दोन उपनिरीक्षक आणि दोन महिलांसह १२ पोलीस कर्मचारी असे एकूण १५ जणच ‘डे-नाईट’ काम करीत आहेत. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेतून बदलीवर पाठविण्यात आलेल्या १५ पैकी १० कर्मचारीच येथे रुजू झाले आहेत.घटनास्थळावर कोण जाणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाचा समारंभ धूमधडाक्यात पार पडला. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी रविवारी सायंकाळपासून आपली गाऱ्हाणी, तक्रारी घेऊन येण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी चालवली आहे. मात्र संख्याबळ लक्षात घेता पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याऐवजी समुपदेशनावर भर देणे सुरू केले आहे. त्यामुळे रविवारी तीन आणि आज दिवसभरात चार तक्रारी ‘एनसीआर’ करण्यात आल्या आहेत. रविवारी रात्री काही ठिकाणी वाद झाल्याचे, तणाव असल्याचेही निरोप आले. मात्र, कर्मचारी अधिकारीच नसल्याने गस्तीची वाहने घटनास्थळी पोहचू शकली नाही.