शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

जखमेवर मलमपट्टी विसरा, थेट कृत्रिम त्वचाच लावा; नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांना यश

By निशांत वानखेडे | Updated: October 24, 2024 18:53 IST

संशोधकांनी बनविली अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली कृत्रिम त्वचा : नागपूर विद्यापीठाच्या संशाेधकांचे यश

नागपूर : जखम झाली की मलम लावत पट्टी बांधायची असा उपचार वर्षानुवर्षेपासून केला जात आहे. मात्र आता अशी मलमपट्टी करण्यापेक्षा जखमेच्या ठिकाणी दुसरी त्वचाच लावण्याचे संशाेधन नागपूर विद्यापीठाच्या संशाेधकांनी केले आहे. अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली कृत्रिम त्वचा लावल्याने जखम वेगाने बरी हाेईल आणि संक्रमणही वाढणार नाही, असा दावा संशाेधकांनी केला आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मॉलिक्युलर बायोलॉजी विभागातील संशोधकांनी अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली कृत्रिम त्वचा शोधून तयार केली आहे. मॉलिक्युलर बायोलॉजी विभाग प्रमुख डॉ. दयानंद गोगले आणि लिटूच्या बायोटेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. आरती शनवारे यांनी प्रकल्प प्रमुख डॉ. बिपिन लाडे यांच्या मदतीने हे संशोधनकार्य पूर्ण केले आहे. बायोटेक्नोलॉजीचे विद्यार्थी आकाश कांदी यांचाही सहभाग आहे. राजीव गांधी जैविक तंत्रज्ञान (आरजीबीसी) प्रकल्पाअंतर्गत विद्यापीठातील पदव्युत्तर वनस्पती विभागाने जखमांमुळे हाेणारे संक्रमण रोखण्यासाठी व बरे होण्यासाठी अँटीमायक्रोबियल गुणधर्म असलेली नवीन कृत्रिम त्वचा विकसित करण्याबाबत २०१९-२०२० मध्ये संशोधनास सुरुवात केली. यात विद्यापीठाच्या संशाेधकांना क्रांतिकारी यश मिळाले आहे.

कसा करायचा उपयाेग?

जखम झालेल्या जागेवर पट्टीच्या ऐवजी या कृत्रिम त्वचेचा तुकडा लावल्याने जखम सुकेल आणि बरी होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या औषधीय घटकांचा वापर या कृत्रिम त्वचेत करण्यात आला आहे. या त्वचेमुळे जखम झाकली जाईल आणि बरीही होईल. जखम झालेल्या ठिकाणी कमी वेळात नैसर्गिक त्वचा येण्यासही या संशोधनामुळे शक्य होणार आहे. ही त्वचा जैवविघटनशील असल्याने जखमेवरून काढून टाकल्यानंतरही ती आपोआप विघटित होईल आणि त्यातून दीर्घकाळ टिकणाऱ्या कचऱ्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही.

काेणते घटक वापरले?या नाविन्यपूर्ण संशोधनात सोडियम अल्जिनेट, जिलेटिन, किटोसन आणि अँटीमायक्रोबियल एजंट यांचा वापर करून कृत्रिम त्वचा तयार केली. ज्यामुळे उच्च दर्जाच्या जखमा लवकर बरी होण्याकरिता मदत मिळेल.

नाविन्यपूर्ण वैशिष्ट्येजखमांवर मलमपट्टी करण्याची वर्षानुवर्षीची पद्धत अनेकदा संक्रमण रोखण्यात अपयशी ठरते. कृत्रिम त्वचेमध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असून ज्यामध्ये गॅलिक ॲसिड आणि थायमॉल यांचा समावेश आहे. यातील नैसर्गिक गुणधर्म जंतूंना मारत संक्रमण रोखण्यास मदत करते. कृत्रिम त्वचा ही नैसर्गिक त्वचेसारखी दिसू शकते. संशोधकांनी निर्माण केलेली कृत्रिम त्वचा ही नैसर्गिक त्वचे करिता हानिकारक नसल्याचे विविध चाचण्यांमधून दिसून आले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठscienceविज्ञानnagpurनागपूरHealthआरोग्य