आॅनलाईन लोकमतनागपूर : मनोरु ग्णांच्या नोंदणी शुल्काच्या पावतीवर बनावट नोंदी करून जास्त शुल्क घेणाऱ्या स्थानिक मनोरु ग्णालयातील लिपिकाची बनवाबनवी उघड झाली आहे. राजकुमार पंडलिक ठोमळे (वय ५७, रा. चंदनशेष नगर) असे आरोपी लिपिकाचे नाव असून, मानकापूर पोलिसांनी त्याच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला.मानकापूरच्या प्रादेशिक मनोरु ग्णालयातील ओपीडीत ठोमळेची रु ग्ण पंजीकरणासाठी नियुक्ती होती. येथे उपचारासाठी आलेल्या रु ग्णाची नोंदणी करण्यासाठी ४० रु पये शासकीय शुल्क आहे. मात्र, आरोपी ठोमळे रु ग्णांच्या नातेवाईकांकडून ८० रु पये घ्यायचा. त्याची पावती देण्यापूर्वी आरोपी कार्बन कॉपीवर ८० ऐवजी ४० रु पये नोंदवायचा. अशा प्रकारे त्याने रु ग्णांचे नातेवाईक आणि प्रशासनासोबत तब्बल तीन वर्षे बनवाबनवी केली. त्याचप्रमाणे २६ डिसेंबर २०१४ ते १० आॅक्टोबर २०१४ या कालावधीत २९,४७६ रु पयांची अफरातफर केली. हा गैरप्रकार लक्षात आल्यानंतर वरिष्ठांनी ठोमळेला विचारणा केली असता तो असंबंद्ध माहिती देऊ लागला. तो गुन्हयाची कबुली देत नसल्यामुळे डॉ. प्रवीण निलकंठ नवघरे यांनी मानकापूर ठाण्यात तक्र ार नोंदवली. त्यावरून एएसआय एजाज शेख यांनी आरोपी ठोमळेविरु द्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
नागपूरच्या मनोरुग्णालयातील लिपिकाची बनवाबनवी उघड; ३० हजार रुपये हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 13:57 IST
मनोरु ग्णांच्या नोंदणी शुल्काच्या पावतीवर बनावट नोंदी करून जास्त शुल्क घेणाऱ्या स्थानिक मनोरु ग्णालयातील लिपिकाची बनवाबनवी उघड झाली आहे.
नागपूरच्या मनोरुग्णालयातील लिपिकाची बनवाबनवी उघड; ३० हजार रुपये हडपले
ठळक मुद्देपावतीवर बनावट नोंदीमानकापुरात गुन्हा दाखल