शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरनजिकच्या जंगलात वाघाच्या बछड्याचे सहा तुकडे आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 11:22 IST

मानसिंगदेव अभयारण्यांतर्गत येणाऱ्या खुर्सापार (ता. रामटेक) च्या जंगलात वाघाच्या बछड्याच्या शरीराचे सहा तुकडे आढळून आल्याने खळबळ उडाली. त्याला वाघाने मारले असावे, अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमानसिंगदेव अभयारण्यातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानसिंगदेव अभयारण्यांतर्गत येणाऱ्या खुर्सापार (ता. रामटेक) च्या जंगलात वाघाच्या बछड्याच्या शरीराचे सहा तुकडे आढळून आल्याने खळबळ उडाली. त्याला वाघाने मारले असावे, अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला.वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण साठवणे आणि क्षेत्र सहायक जीवन पवार हे गुरुवारी सकाळी खुर्सापार परिसरातील जंगलात गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना काही अंतरावर दुर्गंधी आल्याने त्यांनी शोध घेतला. काही अंतरावर त्यांना वाघाच्या बछड्याचा पाय आढळून आला. त्यापासून काही दूर अंतरावर त्याचे शरीर व अन्य अवयव आढळून आले.सर्व अवयव शाबूत असल्याचे प्रवीण साठवणे यांनी सांगितले. या प्रकारामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण साठवणे यांनी सांगितले की, तो बछडा अंदाजे एक वर्षाचा असून, त्याचे सर्व अवयव शाबूत असल्याने त्याची याच परिसरातील वाघाने शिकार केली असावी.कोणताही वाघ त्यांच्या परिसरात दुसऱ्या वाघाचे किंवा त्यांच्या बछड्यांचे वर्चस्व सहसा प्रस्थापित होऊ देत नाही. त्यातून या बछड्याला वाघानेच मारले असावे, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. हा बछडा ‘अवनी’ वाघिणीचा असल्याचीही चर्चा होती.माहिती मिळाल्यानंतर वनसंरक्षक गोवेकर यांनी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घटनास्थळाला भेट दिली. मात्र, त्यांनी या संदर्भात काहीही सांगण्यास नकार दिला.

टॅग्स :Tigerवाघ