शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वन महोत्सव विशेष : वृक्षारोपण करताना देशी झाडांना द्या प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 20:46 IST

वृक्षारोपण करणे गरजेचे आहे पण निव्वळ शोभेच्या झाडांची लागवड करण्यापेक्षा अशा देशी झाडांची लागवड केली तर त्याचे फायदे अधिक आणि चिरकाल टिकणारे ठरतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आपल्या परिसरात असलेल्या वड, आंबा, चिंच अशा विशाल झाडांकडे कधी निरखून पाहिलेत का? या गर्द हिरव्या झाडांची घनदाट सावली, फांदीफांदीवर असलेले पक्ष्यांचे घरटे, त्यांचा किलबिलाट पाहायला मिळेल. हे चित्र दुर्मिळ वाटते म्हणून वृक्ष लागवड करण्याची गरज आहे. कोणत्याही प्रजातीच्या झाडाचे असो, वृक्षारोपण करणे गरजेचे आहे पण निव्वळ शोभेच्या झाडांची लागवड करण्यापेक्षा अशा देशी झाडांची लागवड केली तर त्याचे फायदे अधिक आणि चिरकाल टिकणारे ठरतील, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.गेल्या काही वर्षांपासून अनेक पर्यावरणप्रेमींकडून देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्याबाबत आग्रह होत आहे. मधल्या काळात रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करताना गुलमोहर, सुबाभूळ किंवा लांब वाढणाऱ्या अशोका आदी वृक्षांच्या लागवडीचे चलन वाढले होते. मात्र काही पर्यावरण प्रेमींच्या मते हे परदेशी वृक्ष शोभिवंत दिसण्याशिवाय फारसे फायदेशीर नाहीत. याबाबत वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. निरंकुश खुबाळकर यांनी दिलेली माहिती उपयुक्त अशी आहे.डॉ. खुबाळकर यांच्या मते वृक्षांमध्ये भेदभाव करता येणार नाही. ज्याप्रमाणे माणसे आणि पक्षीही या देशातून त्या देशात मुक्त विहार करीत असतात, त्याप्रमाणे वृक्षांची आदानप्रदान गैर नाही. मात्र देशी प्रजातीच्या वृक्षांचे फायदे अधिक आहेत. आंबा, वड, चिंच, पिंपळ, कडुलिंब हे वृक्ष आकाराने मोठे आणि त्यांचा परीघ अधिक असतो. त्यामुळे दूर दूर अंतरावर लावले तरी छान बहरतात. ही झाडे दाट असल्याने पक्ष्यांची जैवविविधता अधिक वाढते. घनदाट सावली ही कधीही शांतता देणारी असते. शिवाय फळे येत असल्याने माणसांसह प्राणी आणि पक्ष्यांना लाभदायक असतात. मोठे उंबराचे झाड हे याचप्रमाणे फायदेशीर असते. जाड पानांमुळे आॅक्सिजन बाहेर सोडण्याची क्षमता अधिक असते. महत्त्वाचे म्हणजे ही झाडे एकदा लावली की वर्षानुवर्षे टिकून राहतात, त्यामुळे पुन्हा पुन्हा वृक्षारोपणाची गरज पडत नाही.याउलट गुलमोहरासारखे वृक्ष फार टिकणारे नसतात. मात्र या झाडांना एकदमच नाकारण्यापेक्षा मधे मधे लागवड करण्यात गैर नाही. उन्हाळ्यात रस्त्याने जाताना पळस फुलांसारखी या झाडांची बहरलेली फुले कधीही आकर्षित करतात. त्यामुळे देशी वृक्षांना प्राधान्य देताना या झाडांचीही निवड आवश्यक असल्याचे मत डॉ. खुबाळकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :forestजंगल