शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये वाघाच्या शोधात वनविभाग : कॅमेरा ट्रॅपची संख्या ३० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:56 IST

मिहान परिसरात कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ असल्याची पुष्टी झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. मंगळवारी कॅमेऱ्याची संख्या वाढवून ३० वर नेली आहे.

ठळक मुद्देदर्शनी ठिकाणांवर उपायांसाठी बॅनर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मिहान परिसरात कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ असल्याची पुष्टी झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. मंगळवारी कॅमेऱ्याची संख्या वाढवून ३० वर नेली आहे. तसेच वन कर्मचाऱ्यांच्या चमूला दिवस-रात्र गश्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.वन विभागाने मिहान परिसरात कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्याला पत्र जारी केले आहे. कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय परिसरालगतच्या गावांमध्ये जाऊन वन कर्मचारी गावकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगत आहेत.विशेषत: परिसर आणि लगतच्या दर्शनीय स्थळांवर उपाययोजना संदर्भात बॅनर लावण्यात आले आहेत. परंतु मंगळवारी कोणत्याही कॅमेऱ्यात वाघ दिसला नाही. काही दिवसांपूर्वी मिहानच्या इन्फोसिस कंपनीजवळ पट्टेदार वाघ दिसल्याचा दावा स्थानिक कर्मचाऱ्यांनी केला होता. शनिवारी परिसरात ओल्या मातीत वाघाचे पगमार्क दिसले होते. त्यानंतर सेमिनरी वन परिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि रेस्क्यू चमूने अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान शौचासाठी गेलेल्या काही मजूरांनी कंपनीच्या मागील भागात पट्टेदार वाघ दिसल्याची माहिती दिली होती. परंतु वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी गेल्यानंतर वाघ दिसला नाही.शनिवारी रात्री घटनास्थळाजवळ ५ कॅमेरे लावण्यात आले. पण रविवारी रात्री १० वाजता एका कॅमेऱ्या ट्रॅपमध्ये वाघाचे चित्र कैद झाले. त्यानंतर डीसीएफ प्रभुनाथ शुक्ल, एसीएफ काळे, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते, आरएफओ विजय गंगावने यांनी परिसरात कंपन्यांमध्ये उपाययोजनासंदर्भात कर्मचाऱ्यांची बैठक घेतली होती.

टॅग्स :TigerवाघMihanमिहान