शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमधील मुलीकडून नागपुरात जबरदस्तीने वेश्याव्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 22:54 IST

राजस्थानमधील एका मुलीचे अपहरण करून तिला नागपुरात आणल्यानंतर दलालाने तिची गंगाजमुनातील वारांगनांना विक्री केली.

ठळक मुद्देअपहरण करून आणले अन् वेश्यावस्तीत विकलेतीन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतनागपूर : राजस्थानमधील एका मुलीचे अपहरण करून तिला नागपुरात आणल्यानंतर दलालाने तिची गंगाजमुनातील वारांगनांना विक्री केली. दलालाकडून विकत घेतल्यानंतर आरोपींनी तिला नरकात डांबून ठेवत तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला. लकडगंज पोलिसांनी रविवारी सायंकाळी या पीडित मुलीची सुटका करून तीन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.सुशीला लखन कालखोर (वय ३७), लखन विक्रम कालखोर (वय ४२). जया लखन कालखोर (वय २२) आणि कश्मिराबाई, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. तिला एका दलालाने फूस लावून दोन महिन्यांपूर्वी नागपुरात आणले. येथील रेडलाईट एरिया म्हणून ओळखला जाणाऱ्या  गंगाजमुनात सुशीला, लखन आणि जया या तिघांनी दलालाकडून या अल्पवयीन मुलीची खरेदी केली. त्यानंतर तिला कश्मिराबाईच्या अड्ड्यावरील एका निमुळत्या खोलीत डांबून तिच्याकडून ते जबरदस्तीने देहविक्रय करवून घेऊ लागले. तब्बल दोन महिन्यांपासून ती येथे नरकयातना भोगत होती. ही माहिती कळल्यानंतर लकडगंज पोलिसांनी रविवारी सायंकाळी कश्मिराबाईच्या कुंटणखान्यावर छापा घातला. येथून पीडित मुलीची सुटका केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या  उपरोक्त चार आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (पिटा) तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.गरीब कुटुंबातील मुलगीपीडित मुलगी अत्यंत गरीब परिवारातील आहे. तिच्या आईवडिलांच्या पायांना व्याधी आहे. त्यामुळे ते दिव्यांगाचे जीवन जगतात. मुलगी दिसायला बरी असल्याचे पाहून दलालाने फूस लावून तिला नागपुरात आणले आणि येथे तिची विक्री केली होती, असे समजते.

 

 

 

 

 

 

टॅग्स :Kidnappingअपहरण