शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सेव्हन स्टारवर सक्तीची कारवाई करण्यास मनाई : हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 21:12 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये सेव्हन स्टार हॉस्पिटलसह इतर संबंधितांविरुद्ध पुढील आदेशापर्यंत सक्तीची कारवाई व दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई केली. परंतु, पोलिसांसाठी प्रकरणाचा तपास करण्याचा मार्ग मोकळा ठेवला.

ठळक मुद्दे राज्य सरकारला नोटीस जारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये सेव्हन स्टार हॉस्पिटलसह इतर संबंधितांविरुद्ध पुढील आदेशापर्यंत सक्तीची कारवाई व दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई केली. परंतु, पोलिसांसाठी प्रकरणाचा तपास करण्याचा मार्ग मोकळा ठेवला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या हॉस्पिटलवर १७ कोरोनाबाधित रुग्णांकडून सरकारी दरापेक्षा जास्त उपचार शुल्क घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, मनपाने रुग्णांचे ६ लाख ८६ हजार ५२७ रुपये परत करण्याचा हॉस्पिटलला आदेश दिला. तसेच, हॉस्पिटलवर ५ लाख रुपये दंड ठोठावला. त्यानंतर मनपाच्या झोन-५ चे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट रोजी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून हॉस्पिटलविरुद्ध भादंविच्या कलम १८८, २९०, आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम ५१ व ५३ आणि साथरोग कायद्यातील कलम ३ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. तो एफआयआर रद्द करण्यासाठी हॉस्पिटलने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने हॉस्पिटलला वरीलप्रमाणे अंतरिम दिलासा दिला. तसेच सरकारला नोटीस बजावून यावर २८ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. हॉस्पिटलतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhospitalहॉस्पिटल