शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रथमच अवयवदानानंतर देहदानही! मेश्राम कुटुंबियांचा पुढाकार; समाजासमोर ठेवला आदर्श 

By सुमेध वाघमार | Updated: January 30, 2024 18:33 IST

अवयवदान मानवतेसाठी सर्वात मोठे योगदान आहे.

नागपूर: अवयवदान मानवतेसाठी सर्वात मोठे योगदान आहे. अवयवाच्या प्रतीक्षेत मृत्यूच्या दाढेत जगणाऱ्यांना नवे आयुष्य मिळत आहे. तसेच अनेक डॉक्टर घडविण्यासाठी देहदानही तितके च महत्त्वाचे आहे. याची जाण असलेल्या नागपुरातील मेश्राम कुटुंबियांनी अवयवदानासोबतच देहदानही केले. नागपूरच नव्हे तर विदर्भात हे पहिल्यांदाच झाले. कामगार कॉलनी, सुभाष नगर येथील रहिवासी मोरेश्वर मेश्राम, (६९) असे अवयवदात्याचे नाव. वभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने (झेडटीसीसी) दिलेल्या माहितीनुसार, मेश्राम हे एका कं पनीमध्ये चौकीदार म्हणून कामाला होते. सामाजिक कार्यात ते अग्रेसर होते.

काही दिवसांपूर्वी अचानक त्यांची प्रकृती खालवली. त्यांना सुरूवातीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहत त्यांना अ‍ॅलेक्सीस हॉस्पिटलमध्ये स्थानांतरीत करण्यात आले. तिथे त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव म्हणजे ‘ब्रेन हॅमरेज’ झाल्याचे निदान झाले. उपचार सुरू असतानाच त्यांचे ‘ब्रेन डेथ’ म्हणजे मेंदू मृत झाले. याची माहिती कुटुंबियांना देवून अवयवदानाविषयी समुपदेशन करण्यात आले. त्यांची मुले सुमित व वैभव मेश्राम यांनी अयवदानाला मंजुरी दिली. यामुळे दोन मूत्रपिंड, यकृत आणि कॉर्नियाचे दान करण्यात आले. या दोन्ही भावांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे’ला (एम्स) वडिलांचे देहदानही केले. या दानामुळे मेश्राम कुटुंबियांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. 

-एक पुरुष, दोन महिलांना नवे आयुष्यमेश्राम यांचे एक मूत्रपिंड अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटमधील ३२ पुरुष रुग्णाला तर दुसरे मूत्रपिंड ऑरेंज सिटी हॉस्पिटलमधील ५८ वर्षीय महिलेला दान करण्यात आले. तर यकृत अ‍ॅलेक्सिस हॉस्पिटलमधील ५९ वर्षीय महिलेला दान करण्यात आले. कॉर्निया महात्मे आय बँकला देण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूर