शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खाद्य प्रक्रिया उद्योगाचा जीडीपीमध्ये १४ टक्के वाटा : मिलिंद कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 23:59 IST

कृषीमालावार प्रक्रिया करून विक्री केल्यास चांगला नफा मिळविता येतो. खाद्य प्रक्रिया उद्योगात एससी, एसटी नवउद्योजकांना अपार संधी असल्याचे मत दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘खाद्य प्रक्रिया उद्योगात एससी, एसटी उद्योजकांना संधी’ कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषीमालावार प्रक्रिया करून विक्री केल्यास चांगला नफा मिळविता येतो. खाद्य प्रक्रिया उद्योगात एससी, एसटी नवउद्योजकांना अपार संधी असल्याचे मत दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले.डिक्की विदर्भ चॅप्टरच्यावतीने आणि भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने ‘खाद्य प्रक्रिया उद्योगात एससी, एसटी उद्योजकांना संधी’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.व्यासपीठावर मंत्रालयातील अधिकारी डॉ. जितेंद्र डोंगरे, वरिष्ठ संशोधक डॉ. अजय तुमाने, एलआयटीच्या माजी संचालिका डॉ. प्रतिमा शास्त्री, अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे, सिडबीचे महाव्यवस्थापक पी.के. नाथ, डिक्की साऊथ इंडियाचे अध्यक्ष राजा नायक, डिक्की वेस्ट इंडियाचे अध्यक्ष निश्चय शेळके, विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष गोपाल वासनिक, उपाध्यक्ष रुपराज गौरी, मराठवाडाचे अध्यक्ष मनोज आदमने, बँकिंग तज्ज्ञ विजय सोमकुंवर, विदर्भ महिला विंगच्या अध्यक्षा विनी मेश्राम उपस्थित होते.कांबळे म्हणाले, खाद्य प्रक्रिया उद्योगाचा जीडीपीमध्ये १४ टक्के वाटा असून इतर उद्योगांच्या तुलनेत सहावे सर्वात मोठे क्षेत्र आहे. देशात आठ कार्यशाळांमधून दहा हजार एससी, एसटी तरुणांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. विदर्भात १०० नवे उद्योजक निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. देशात एकूण हजार उद्योजक तयार करण्यात येणार आहे.डॉ. प्रतिमा शास्त्री यांनी छोटे खाद्य प्रक्रिया उद्योग घरूनच करता येऊ शकतात, यावर माहिती दिली. डॉ. तुमाने यांनी खाद्य प्रक्रिया उद्योगातील घडामोडी आणि नव्या संशोधनाची माहिती दिली. शशिकांत केकरे यांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यावर सांगितले. नाथ यांनी खाद्य प्रक्रिया उद्योगासाठी सिडबीच्या अर्थसहाय योजनांची माहिती दिली. निश्चय शेळके, गोपाल वासनिक आणि विनी मेश्राम यांनी एससी, एसटी तरुण-तरुणींना खाद्य प्रक्रिया उद्योगात येण्याचे आवाहन केले.कार्यशाळेत क्रांती गेडाम, प्रदीप मेश्राम, गौतम सोनटक्के, मंगेश डोंगरवार, श्रद्धानंद गणवीर, समीर गेडाम, राज मेंढे, संदीप भरणे, रवींद्र घनबहादूर, पंकज सोनोने उपस्थित होते.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रnagpurनागपूर