शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशपरदेशातून आले अनुयायी

By सुमेध वाघमार | Updated: October 23, 2023 20:03 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले.

नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. हजारो वर्षे दारिद्यांच्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाची अस्मिता जागृत केली. नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेऊन बुद्ध तत्त्वज्ञानाला समाजमनात रुजविण्याचे क्रांतीदर्शी कार्य पूर्ण केले. त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी. सोमवरी सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरुप आले. विशाल, उचंबळणारा, गर्जणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला. जय बुद्ध व जयभीमच्या जयघोषाने संपूर्ण परिसर निणादत होता.  

हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर रात्री उशीरापर्यंत उतरत होते. देशाच्या कानाकोपºयातूनच नव्हे तर नेपाळ, थायलॅण्ड, जापान, श्रीलंका येथूनही अनुयायी दीक्षाभूमीवर आले आहेत. मंगळवारी लाखो अनुयायांच्या गर्दीने दीक्षाभूमी फुलून गेली. युवकांच्या झुंडीच्या झुंडी ‘जयभीम’चा नारा देत गर्दीत शामील होत होती. गर्दी अफाट असली तरी सर्वच एकमेकांना सांभाळून घेत होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांची भाषा विविध असली तरी ‘जयभीम’ या एकाच शब्दाने मदतीचा हात समोर करीत होते.

अनुयायांच्या सेवेत शेकडो संघटना हजारो मैलावरु न लाखोंच्या संख्येने येणाºया अनुयायांसाठी हजारावर  संघटना सरसावल्या आहेत. पाण्यापासून ते चहा-नाश्ता व दोन वेळच्या जेवणाची सोय उपलब्ध करून दिली. काही सामाजिक व वैद्यकीय संघटनांनी वैद्यकीय सेवेसोबतच नि:शुल्क औषधी उपलब्ध करून दिल्या. 

९ फूट उंच बाबासाहेबांच्या पुतळ्याने वेधले लक्षदीक्षाभूमीवर पुस्तकांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या १५ सेंटीमीटरपासून ते ९ फुटांचे पुतळ्यांचे स्टॉल्स आकर्षण ठरले. प्रसिद्ध शिल्पकार प्रज्ञा मूर्ती यांनी तयार केलेला संविधान हाती घेऊन समतेचा मार्ग दाखविणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लक्ष वेधून घेणारा होता. या वर्षी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्यासह विविध महापुरुषांचे पुतळे स्टॉल्सवर उपलब्ध होते. यात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फूले, लोकनायक बिरसा मुंडा, महाराज बसेश्वर, संत नारायण राजगुरु, लोकशाहीर अन्नाभाऊ साठे आदींचे पुतळे होते.

टॅग्स :nagpurनागपूर