शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅक्टेव’ मध्ये आठ राज्यातील लोककलाविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:50 IST

उत्तर पूर्व भारतातील आठ राज्यातील लोककलेचा अविष्कार चार दिवस दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ‘आॅक्टेव नागपूर’ या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते झाले. या महोत्सवात पारंपरिक लोकनृत्याबरोबरच तेथील पारंपरिक पोशाख आणि हस्तकलेचाही अनुभव घेता येणार आहे.

ठळक मुद्देमहापौरांच्या हस्ते झाले उद्घाटन : नृत्य, संगीताची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर पूर्व भारतातील आठ राज्यातील लोककलेचा अविष्कार चार दिवस दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात ‘आॅक्टेव नागपूर’ या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते झाले. या महोत्सवात पारंपरिक लोकनृत्याबरोबरच तेथील पारंपरिक पोशाख आणि हस्तकलेचाही अनुभव घेता येणार आहे.

महोत्सवाच्या उद्घाटनाला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा संचालक दीपक खिरवाडकर, सांस्कृतिक केंद्राच्या पश्चिम झोनचे संचालक फुर्रखान, कोलकाता केंद्राच्या संचालक गौरी बसू, गोवा सरकारच्या कला आणि सांस्कृतिक खात्याचे सचिव दौलत हवालदार, महावितरणचे मुख्य अभियंता अभय हरणे, महाजनकेचे मुख्य अभियंता राजेश पाटील यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या की, गेल्या काही वर्षात नागपूर हे ग्लोबली प्रगती करीत आहे. सध्यातर शहरात सुरू असलेल्या दोन मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि नागपुरात सातत्याने होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातून नागपूरला सांस्कृतिक हब म्हणण्यास हरकत नाही.उद्घाटनानंतर मणिपूरचे पोंगचोलम व थांग था, मेघालयाचे वांगला, मिझोरम राज्यातील चेरवा, नागालॅण्डचा नागदा, सिक्कीमचा चंडी, त्रिपुराचा होझागिरी, अरुणाचल प्रदेशचा टप्पू व आसामचा रंगोली बिहू या लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले. या लोकनृत्य कलावंतांनी पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक वाद्यावर तेथील लोककलेची अनुभूती नागपूरकरांना करवून दिली. 

 

टॅग्स :South Cental Zone Cultural Centre, Nagpurदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रNanda Jichakarनंदा जिचकार