शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:50 IST

व्हॅलेंटाईन डे. प्रेमाच्या अभिव्यक्तीचा हा अनुपम सोहळा बुधवारी शहरात उत्साहात साजरा झाला. प्रेमरंगी रंगलेल्या तरुणाईने आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबपुष्पाची भेट देत प्रेमाची कबुली दिली.

ठळक मुद्देप्रेमरंगी रंगली तरुणाई : व्हॅलेंटाईन डेला कुणी केले रक्तदान, कुणी जागवले राष्ट्रप्रेम

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : व्हॅलेंटाईन डे. प्रेमाच्या अभिव्यक्तीचा हा अनुपम सोहळा बुधवारी शहरात उत्साहात साजरा झाला. प्रेमरंगी रंगलेल्या तरुणाईने आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबपुष्पाची भेट देत प्रेमाची कबुली दिली. कुणाच्या पदरात होकार पडला, कुणाच्या नकार. पण, म्हणून या प्रेमोत्सवाचा आनंद काही कमी झाला नाही. काही प्रतिगामी संघटनांनी दिलेल्या इशाऱ्याला न जुमानता तरुणाईने अगदी दणक्यात व्हॅलेंटाईन डे साजरा केला. या दिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. या क्रमात कुणी रक्तदान केले तर कुणी भारतमातेच्या प्रतिमेला गुलाबाचे फूल भेट देत राष्ट्रप्रेम जागवले. मागच्या सात दिवसांपासून व्हॅलेंटाईन वीक साजरे करणाºया तरुणार्ईला व्हॅलेंटाईन डेची विशेष प्रतीक्षा होती. अखेर आज हा दिवस उगवताच अनेकांनी प्रेमाचा रंग असलेल्या लाल रंगाचे वस्त्र घालून महाविद्यालय गाठले. शहरातील प्रत्येकच महाविद्यालयाचे कट्टे आज बहरले होते.फुटाळा झाले ‘लव्ह स्टेशन’न्यू इयर असो फ्रेण्डशिप डे वा व्हॅलेंटाईन डे. शहरातील तरुणाईची पावले आपसूकच फुटाळा तलावाकडे वळतात. तरुणाईच्या हक्काचे हे डेस्टिनेशन या प्रेमोत्सवदिनी जणू ‘लव्ह स्टेशन’ झाले होते. प्रेमीयुगुलांच्या गर्दीने फुटाळा दिवसभर फुलले होते. संध्याकाळी तर जणू या ठिकाणाला यात्रेचेच स्वरूप आले होते. हातात रेड बलून घेतलेले ती आणि तो फुटाळयाच्या प्रत्येक कोपऱ्यावर नजरेस पडत होते. कुणी आपल्या जीवलगाला द्यायला भेटवस्तू आणली होती तर कुणी आपल्या हळव्या भावनांना शुभेच्छापत्रांच्या हवाली केले होते.कुटुंबीयांसोबत हॉटेलिंगकेवळ तरुणाईच नाही तर प्रत्येकच वयोगटातील हौशी मंडळींनी या प्रेमोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला. अनेक जण सहपरिवार जेवायला आल्यामुळे शहरातील हॉटेल्स हाऊसफुल्ल झाली होती. काही प्रसिद्ध हॉटेल्सनी हा क्षण कॅश करण्यासाठी स्पेशल पॅकेजही जाहीर केले होते. या पॅकेजसचाही लाभ उचलण्यात आला. काहींनी जवळपासच्या पर्यटनस्थळी तर काहींनी देवदर्शनाने हा दिवस साजरा केला.

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेnagpurनागपूर