शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सजावटीची फुले यंदा स्वस्त; लग्नकार्यात मागणी वाढली

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 22, 2023 18:54 IST

Nagpur News यंदा सजावटीच्या फुलांचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाले आहेत. त्यामुळे यंदा खऱ्या फुलांच्या सजावटीवर लोकांचा भर आहे.

मोरेश्वर मानापुरे 

नागपूर : वेडिंग डेकोरच्या थीममध्ये स्टेज, हॉल वा लॉनची सजावट फुलांनी करण्याची क्रेझ वाढत आहे. स्टेजची सजावट शैलीला अनुरूप आणि ग्लॅमर वाढविणारी असते. त्यामुळे फुलांच्या सजावटीवर वर-वधूंसह संपूर्ण कुटुंबीयांचा भर असतो. यंदा सजावटीच्या फुलांचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाले आहेत. त्यामुळे यंदा खऱ्या फुलांच्या सजावटीवर लोकांचा भर आहे.लग्नात स्टेज केंद्रस्थानी असतो. सजावटीच्या निमित्ताने कायमस्वरुपी आठवणी या प्रसंगी तयार केल्या जातात. यंदा सजावटीच्या फुलांचे दर आटोक्यात असल्यामुळे लोकांच्या खिशाला झळ पोहोचणार नाही. अर्थात काटकसर करावी लागणार नाही. तपत्या उन्हामुळे फुले टिकत नाहीत वा टवटवीत होत नसल्याची शेतकऱ्यांची चिंता आहे. यंदा पॉलिहाऊसमध्ये उत्पादन वाढले आहे.

सजावटीच्या फुलांना उन्हाळ्यात मागणी कटफ्लॉवर अर्थात सजावटीच्या फुलांना उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते. सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात लागणारे जरबेरा, डच गुलाब, कार्नेशन, आर्किड, लिलियममध्ये आशियाटिक, ओरिएन्टल, जिप्सोफिलिया, गोल्डन रॉड या फुलांना उन्हाळ्यात जास्त मागणी असते. ही फुले स्थानिक उत्पादकांसह बेंगळुरू येथून मोठ्या प्रमाणात नागपुरातील फुलांची मुख्य बाजारपेठ सीताबर्डी नेताजी फूल मार्केटमध्ये विक्रीसाठी येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही विक्रेते नोंदणी करूनच फुलांची विक्रीसाठी मागणी करीत असल्याची माहिती नेताजी फूल मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे यांनी दिली.

दररोज २५ लाखांची उलाढालउन्हाळ्यात सजावटींच्या फुलांची उलाढाल दररोज २५ लाखांपेक्षा जास्त होते. या दिवसात लग्नकार्याचे सजावटीचे ऑर्डर येतात. त्यानुसार बेंगळुरू, मुंबई आणि पुणे येथून फुले मागवावी लागतात. सध्या खऱ्या फुलांनी सजावट करण्याची क्रेझ वाढत असल्यामुळे व्यवसायात वाढ झाल्याचे रणनवरे यांनी सांगितले.

स्थानिकांसह बेंगळुरू, मुंबई, पुणे येथून आवकफूल बाजारात नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह बेंगळुरू, मुंबई, पुणे येथून पूजेची आणि सजावटीच्या फुलांची आवक होते. सध्या सांगली, सातारा, संगमनेर, अहमदनगर, हैदराबाद, अमरावती, अकोला, छिंदवाडा या भागातूनही फुले विक्रीसाठी येत आहेत. पॉलीहाऊसमधून सजावटीची फुले उत्पादक आणतात.

 

टॅग्स :Flowerफुलं