शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नाल्यांवरील अतिक्रमणामुळे उद्भवली पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 20:23 IST

नाल्यांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे घोगली, बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वर या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. अतिक्रमणांमुळे पाणी तुंबले आणि वस्त्यांमध्ये घुसले तर कुठे पाण्याने पूल वाहून नेले आहेत. संबंधित नाले ताब्यात घेऊन त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. सोबतच संबंधित परिसराचे सर्वेक्षण करून आपद्ग्रस्तांना शासकीय मदत दिली जाणार आहे.शुक्रवारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. रस्त्यांवर पाणी तुंबले. वस्त्यांमध्ये पाणी शिरले. शहराच्या बाह्य भागात परिस्थिती आणखीनच चिंताजनक होती. शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूरग्रस्त भागाचा भागाचा दौरा केला. पाहणी दौऱ्यात नाल्यांवर अतिक्रमण केल्याचे आढळून आले.

ठळक मुद्देघोगली, बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वर परिसराला फटका : पालकमंत्र्यांनी केली पाहणीसर्वेक्षणानंतर मिळणार शासकीय मदतमहसुली नाले ताब्यात घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशआदर्श संस्कार विद्या मंदिर , सेंट पॉल शाळांना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाल्यांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे घोगली, बेसा, बेलतरोडी, हुडकेश्वर या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. अतिक्रमणांमुळे पाणी तुंबले आणि वस्त्यांमध्ये घुसले तर कुठे पाण्याने पूल वाहून नेले आहेत. संबंधित नाले ताब्यात घेऊन त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. सोबतच संबंधित परिसराचे सर्वेक्षण करून आपद्ग्रस्तांना शासकीय मदत दिली जाणार आहे.शुक्रवारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. रस्त्यांवर पाणी तुंबले. वस्त्यांमध्ये पाणी शिरले. शहराच्या बाह्य भागात परिस्थिती आणखीनच चिंताजनक होती. शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूरग्रस्त भागाचा भागाचा दौरा केला. पाहणी दौऱ्यात नाल्यांवर अतिक्रमण केल्याचे आढळून आले. याची दखल घेत सर्व अतिक्रमण १५ दिवसात काढा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. ज्या संस्थांनी अतिक्रमण केले आहे त्यांना नोटीस देणे व त्यांचेही अतिक्रमण हटविण्याची सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला केली.घोगली येथे पुलावरून पाणी जाऊन वस्त्यांमध्ये लोकांच्या घरात शिरले. वैद्य प्लायवूड या कंपनीने येथील मूळ नाला वळवून नाल्याच्या भागावर बांधकाम केल्याचे आढळले. या प्रकरणी न्यायालयाने जैसे थे स्थिती कायम ठेवायला सांगितली असली तरी शासनातर्फे न्यायालयाला वस्तुस्थिती सांगितली जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.पोहरा या नाल्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याचे आढळून आले. नागपूर शहराजवळ शिवनी या कामठी तालुक्यातील गावात नाग नदी आणि नाल्याचे पाणी एकत्र आल्यामुळे महापुरासारखी स्थिती निर्माण झाली होती. संपूर्ण गावात पाणी घुसल्याचे दिसत होते. गंभीर पूरस्थिती निर्माण करणाऱ्या नाल्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण प्रशासनाने करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.टेकआॅफ सिटीला नोटीस अनेक बिल्डरांनी आपल्या घरबांधणी योजना करताना नाल्यांच्या जागा आपल्या ताब्यात घेतल्यामुळे नाले लहान झाले व पाणी मोकळेपणे जाऊ शकले नाही. परिणामी अनेक वस्त्या पाण्यात बुडण्याशिवाय पर्याय नव्हता असेही निदर्शनास आले. गोन्ही सिम श्रीरामनगर येथे काही नागरिकांनी घरेच नाल्यात बांधली आहेत. तर टेकआॅफ सिटी या योजनेत बिल्डरने नाल्याचा मोठा भाग आपल्या ताब्यात घेऊन कंपाऊंड वॉल उभारली आहे. याची दखल घेत टेकआॅफ सिटीला नोटीस देण्याचे निर्देस पालकमंत्र्यांनी दिले.नाल्याची जागा घेणाऱ्या दोन्ही शाळांवर कारवाई

 

टॅग्स :floodपूरnagpurनागपूर