शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर फ्लार्इंग क्लब घेणार भरारी

By admin | Updated: December 28, 2016 03:26 IST

नागपूर फ्लाईंग क्लबला केंद्र शासनाच्या नागरी विमान विभागामार्फत विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी मान्यता मिळाली आहे.

उड्डाण प्रशिक्षणासाठी मान्यता : डीजीसीएची मंजुरी, ९० दिवसासाठी पायलट प्रशिक्षण नागपूर : नागपूर फ्लाईंग क्लबला केंद्र शासनाच्या नागरी विमान विभागामार्फत विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या महासंचालक नागरी विमान कार्यालयातर्फे विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी पुन्हा परवानगी दिल्याचे पत्र उपसंचालक डीजीसीए यांचेकडून प्राप्त झाले आहे. नागपूर फ्लाईंग क्लबचा विमान चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी डीजीसीएकडून परवानगी मिळावी यासाठी आवश्यक सर्व सुविधा तसेच तांत्रिक व प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या डीजीसीएच्या चमूने नुक्तीच नागपूर फ्लाईंग क्लबला भेट देऊन उपलब्ध सुविधांची पाहणी केली होती. त्यानुसार नागपूर फ्लाईंग क्लबला ९० दिवसासाठी पायलट प्रशिक्षणासाठी मान्यता मिळाली आहे. नागपूर फ्लाईंग क्लबच्या विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा तसेच पाठपुरावा करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक तथा महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर, मुख्य उड्डाण निर्देशक शीव जयस्वाल यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच फ्लाईंग क्लब पुन्हा एकदा विमान प्रशिक्षणासाठी सज्ज झाला आहे. फ्लाईंग क्लबमध्ये १७ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून १० नवीन प्रशिक्षणार्थी निवड झाली आहे. नागरी उड्डाण महासंचालकांच्या कार्यालयातर्फे विमान उड्डाण प्रशिक्षणाची परवानगी मिळाल्यामुळे फ्लाईंग क्लब आता नवी झेप घेत आहे. विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष अनुप कुमार यांनी नागपूर फ्लाईंग क्लब पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंदर्भात आवश्यक सुधारणा करण्यात येतील, अशी माहिती यावेळी दिली.(प्रतिनिधी) एक महिन्यात पुढील पाच वर्षांची परवानगी मिळेल नागपूर फ्लाईंग क्लबला नोव्हेंबर २०१५ पासून डीजीसीएच्या परवानगीसाठी प्रतीक्षा होती. नागपूर फ्लाईंग क्लबचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पायलट प्रशिक्षणासाठी परवानगी मिळावी यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तसेच प्रशिक्षण परवानगीसाठी पाठपुरावा केल्यामुळे उड्डाण प्रशिक्षणाला परवानगी मिळाली आहे. दोन तांत्रिक अधिकारी व एक सहायक यांची येत्या १५ दिवसात नियुक्ती केल्यानंतर येत्या एक महिन्याच्या आत पुढील पाच वर्षासाठी परवानगी मिळेल, असा विश्वास विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी व्यक्त केला.