शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

महाराष्ट्रदिनी ‘झेंडा’युद्ध रंगणार

By admin | Updated: May 1, 2017 01:10 IST

महाराष्ट्रदिनी उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात विविध संघटना व राजकीय पक्षांमध्ये झेंडायुद्ध रंगणार आहे.

 विदर्भवादी पाळणार काळा दिवस : महाराष्ट्र समर्थक धडाक्यात साजरा करणार नागपूर : महाराष्ट्रदिनी उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात विविध संघटना व राजकीय पक्षांमध्ये झेंडायुद्ध रंगणार आहे. सोमवारी संपूर्ण विदर्भात विदर्भवादी संघटनांतर्फे विदर्भाचा झेंडा फडकवत काळा दिवस पाळण्यात येणार आहे तर अखंड महाराष्ट्राचे समर्थन करणाऱ्या पक्षांकडून महाराष्ट्र दिन धडाक्यात साजरा करण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. एकूणच विदर्भवादी व महाराष्ट्रवादी यांची अस्मितेची लढाई दिसून येणार आहे. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीची हाक संपूर्ण देशात जावी यासाठी विदर्भवादी संघटना सरसावल्या आहेत. १ मे रोजी महाराष्ट्रदिनी संपूर्ण विदर्भात विदर्भवादी संघटनांतर्फे काळा दिवस पाळण्यात येणार आहे. ‘विदर्भ कनेक्ट’तर्फे सर्व ११ जिल्ह्यांतील मुख्यालयी विदर्भाचा झेंडादेखील फडकविण्यात येणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गावांमधील घराघरांवर, चौकात, वेशीवर विदर्भाचे झेंडे लावण्यात येणार आहेत. शिवाय विविध ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ विविध उपक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे हे स्वत: इतर नेत्यांसमवेत नागपुरात ‘विष्णूजी की रसोई’ येथे विदर्भाचा झेंडा फडकविणार आहेत. ‘विरा’तर्फे ‘रक्ताक्षरी’ मोहिम राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताची स्वाक्षरी करून वेगळ्या विदर्भाच्या निर्मितीसंदर्भात निवेदन पाठविण्यात येणार आहे. दुसरीकडे अखंड महाराष्ट्राच्या समर्थकांकडूनदेखील विदर्भात महाराष्ट्रदिन साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. चौकाचौकांमध्ये भगवे झेंडा लावले जाणार असून अखंड महाराष्ट्रासाठी धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. आतषबाजीने मनसेतर्फे महाराष्ट्र दिनाचे स्वागत करण्यात आले. दिवसभरदेखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी महालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल. यानंतर श्रमिक व कामगारांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, दुपट्टा, होमिओपॅथी औषध वितरित करण्यात येईल. शहराच्या सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम होतील. यास प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, शहराध्यक्ष प्रवीण बरडे, जिल्हाध्यक्ष सतीश कोल्हे, किशोर सरायकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी) लोकप्रतिनिधींना विचारणार जाब दरम्यान विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्र्यांसह विदर्भातील सर्व मंत्री, खासदार, आमदारांना वेगळे राज्य केव्हा देता असा भ्रमणध्वनीवरून जाब विचारण्यात येणार आहे. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विदभार्साठी काय केले व काय करणार, असा सवाल देखील करण्यात येईल, अशी माहिती समितीचे नेते वामनराव चटप व मुख्य संयोजक राम नेवले यांनी दिली. समितीच्यावतीने १ मे रोजी गिरीपेठेतील मुख्यालयात सकाळी ८ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर आवाहन आपल्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त जनतेने सहभागी व्हावे यासाठी विदर्भवादी व अखंड महाराष्ट्राचे पुरस्कर्ते, अशा दोघांकडूनदेखील प्रयत्न करण्यात येत आहेत. सोशल मीडिया व ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून यासंदर्भात नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. शिवाय शांतीचा भंग होणार नाही याची काळजी घेणारे ‘मॅसेज’देखील फिरत आहेत. काँग्रेस नेत्यांची भूमिका काय? विदर्भवादी आणि अखंड महाराष्ट्रवादी यांच्या या झेंडायुद्धात काँग्रेस नेत्यांची नेमकी भूमिका काय राहणार याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेस पक्ष वेगळ्या विदर्भाच्या विरोधात असला तरी विलास मुत्तेमवार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी या काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मागील वर्षी वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. त्यामुळे १ मे रोजी हे नेते वेगळ्या विदर्भाच्या लढ्याला जाहीर समर्थन देणार का याकडे लक्ष लागले आहे.