शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  स्कूल बसचे थांबे निश्चित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:46 IST

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने शालेय व्यवस्थापन, प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी स्कूल बसचे थांबे निश्चित करावेत व तसा अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सादर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी शाळा व्यवस्थापनाला केले आहे.

ठळक मुद्देआरटीओचे आवाहन : अहवाल सादर करण्याच्या दिल्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने शालेय व्यवस्थापन, प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी स्कूल बसचे थांबे निश्चित करावेत व तसा अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सादर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी शाळा व्यवस्थापनाला केले आहे. परिणामी, स्कूल बसमुळे होणारे वस्त्यांमधील वाहतुकीची कोंडी व अपघात काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन प्रत्येक शाळांमध्ये शालेय परिवहन समिती स्थापन करण्याचा नियम आहे. मुलांची सुरक्षित ने-आण, परिवहन शुल्क, बस थांबे निश्चित करणे आदींची जबाबदारी या समितीची आहे. सध्या जिल्ह्यातील ४०६० शाळांमधून ३८५५ शाळांमध्ये ही समिती स्थापन झाली. मात्र समिती कागदापुरतीच मर्यादित असल्याने, पालकांनी कुणाच्या विश्वासावर मुले सोपवायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यात शहर आरटीओ कार्यालयाने पुढाकार घेत शाळा व्यवस्थापनेकडून काही सोई करवून घेत असल्याने पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी त्यांनी एका पत्राद्वारे शाळा समितीचे कर्तव्य काय याची माहिती देऊन अहवालच मागितला आहे. या पत्रात शालेय परिवहन समितीद्वारे वाहनाचे सर्व वैध कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना, अग्निशमन उपकरण, प्रथमोपचार पेटी आदी पडताळणी सदर समितीद्वारे करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.कुठेही थांबणाऱ्या स्कूल बसवर नियंत्रणशहरातील वस्त्या, कॉलनीतील रस्त्यांवरही स्कूल बस धावतात. रस्ते लहान व स्कूल बसचा आकार मोठा, असे काहीसे विचित्र चित्र असते. यामुळे वाहतुकीची कोंडी होते, शिवाय अपघाताचाही धोका निर्माण होतो. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्कूलबस थांबे निश्चित करण्यासाठी आदेश जारी केले आहे. त्यानुसार शहर आरटीओने दिलेल्या आदेशामुळे कुठेही थांबणाऱ्या  स्कूल बसवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, १२ मीटरपेक्षा जास्त रुंद असणाऱ्या  रस्त्यावरच थांबे निश्चित करण्याचा व तसा अहवाल ९ एप्रिल २०१८ पर्यंत सादर करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :SchoolशाळाBus Driverबसचालक