शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेसोबत अश्लील कृत्य आरोपीला पाच वर्षे कारावास

By admin | Updated: February 26, 2015 02:17 IST

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पाच वर्षांच्या बालिकेसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. राठी यांच्या न्यायालयाने एका आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास ...

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पाच वर्षांच्या बालिकेसोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. राठी यांच्या न्यायालयाने एका आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार ३०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. उमेश गंगाराम लांबट (३६) रा. नागपूर हाऊसिंग सोसायटी वाठोडा ले-आऊट, असे आरोपीचे नाव असून तो इलेक्ट्रिशियन आहे. सरकार पक्षानुसार या प्रकरणाची हकीकत अशी, पत्नी मुलाला घेऊन माहेरी निघून गेल्याने आरोपी उमेश लांबट हा एकटाच राहत होता. घटनेच्या दिवशी २७ फेब्रुवारी २०१४ रोजी महाशिवरात्री होती. अगदी घरासमोरच्या महादेव मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे पीडित मुलगी ही शेजारी राहणाऱ्या चार वर्षांच्या मुलासोबत महाप्रसादासाठी मंदिरात गेली होती. प्रसाद घेऊन दोघेही घराकडे परतत असताना त्यांच्या मागावर असलेल्या उमेशने त्यांना पेप्सीचे (सुपारी मसाला) पाऊच दिले होते. या दोघांनाही त्याने आपल्या घरी नेले होते. उमेशने मुलाला घरी जाण्यास सांगितले होते. परंतु तो घरी न जाता उमेशच्या घराच्या दारातच उभा होता. मुलगी घरी परतली नाही म्हणून पीडित मुलीची आई तिचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडली. तिला उमेशच्या दारात मुलगा उभा असलेला दिसला; कारण तिला आपली मुलगी या मुलासोबत मंदिरात गेल्याचे माहीत होते. तिने त्याला मुलीबद्दल विचारताच त्याने इशाऱ्याने ती उमेशच्या घरात असल्याचे सांगितले होते. आईने मुलीला जोराने आवाज देताच ती रडत घराबाहेर आली होती. तिने काकाने केलेले कृत्य सांगितले होते. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने या मुलीला दिली होती. लागलीच या घटनेची सूचना नंदनवन पोलिसांना देण्यात आली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक वाय.व्ही. इंगळे यांनी उमेश लांबट याच्याविरुद्ध भादंविच्या ३७६ (२) (१), ५०६, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या कलम १० आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त टी.डी. गौंड यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपीला भादंविच्या ३७६ (२) (१), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम १० अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास, १० हजार रुपये दंड, भादंविच्या ५०६ कलमान्वये तीन महिने कारावास, ३०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील वर्षा आगलावे, आरोपीच्या वतीने अ‍ॅड. खंडारे यांनी काम पाहिले. नायक पोलीस शिपाई अनिल दोनाडकर यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले.(प्रतिनिधी)