शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रो रेल्वेचा पाच टन वजनी लोखंडी पिलरचा ढाचा कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:36 IST

मेट्रो रेल्वेच्या बांधकामाचा गलथानपणा पुन्हा एकदा शुक्रवारी पुढे आला. सीताबर्डी मुंजे चौकातील मेट्रो रेल्वेच्या इंटरचेंज चौकात दुपारी ३.३० वाजता पाच टन वजनाचा (१७५ लोखंडी सळाक) लोखंडी पिलरचा ढाचा रस्त्यावर कोसळला.

ठळक मुद्देजीवहानी नाहीइंटरचेंज मुंजे चौक : मेट्रो रेल्वेचा गलथानपणा उघड

आॅनलाईन लोकमतनागपूर : मेट्रो रेल्वेच्या बांधकामाचा गलथानपणा पुन्हा एकदा शुक्रवारी पुढे आला. सीताबर्डी मुंजे चौकातील मेट्रो रेल्वेच्या इंटरचेंज चौकात दुपारी ३.३० वाजता पाच टन वजनाचा (१७५ लोखंडी सळाक) लोखंडी पिलरचा ढाचा रस्त्यावर कोसळला. हा रस्ता कामादरम्यान बंद केल्यामुळे सुदैवाने जीवहानी झाली नाही. पण पिलर अचानक कोसळल्यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी मेट्रो रेल्वेविरोधात नारेबाजी करून रोष व्यक्त केला.बांधकामादरम्यान यापूर्वी घडलेल्या घटनांपासून मेट्रो रेल्वेच्या कंत्राटदाराने बोध घेतलेला नाही. रिच-१ चे काम एनसीएल ही कंत्राटदार कंपनी करीत आहे. प्राप्त माहितीनुसार, प्रकल्पाचे काम सुरू असताना हायड्रा मशीनचा धक्का लागल्याने लोखंडी पिलरचा ढाचा कोसळला. तत्पूर्वी लोखंडी ढाचा बॅरिकेट्सवर वाकत असल्याचे दिसून येताच क्रेनच्या साहाय्याने तो धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नामुळे ढाचा ५ ते ७ मिनिटात रस्त्यावर झुकला व अचानक कोसळला. सुरक्षेच्या उपाययोजना असल्यामुळे कुठलेही नुकसान वा जीवहानी झाली नाही.घटनेची माहिती मिळताच महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली. त्यावेळी पोलीसही घटनास्थळी पोहाचले. खबरदारी म्हणून त्या भागाचा वीज पुरवठा १ तासाकरिता खंडित करण्यात आला तसेच त्या भागातील रस्ता देखील वाहतुकीकरिता बंद करण्यात आला. मेट्रो मार्शल आणि कर्मचायांनी अपघात स्थळी सुरक्षा व्यवस्थेची कमान संभाळली.क्रेन आणि कटिंग मशीनच्या साहाय्याने झुकलेला लोखंडी ढाचा कापण्यात आला आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. या संपूर्ण बचाव कार्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित घटनास्थळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांकडून घेत होते व आवश्यक सूचना देत होते. आ. सुधाकर देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.चौकशीचे आदेशडॉ. बृजेश दीक्षित यांनी या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी दुपारी १०.३० वाजता घटनेचा आढावा आणि निर्देश देण्यासाठी मेट्रो हाऊसमध्ये बैठक बोलविली आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाही, याकरिता त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना आणि निर्देश दिले आहेत.घटनास्थळी महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) महेश कुमार, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रिच-१) देवेंद्र रामटेककर, उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क) अखिलेश हळवे, मीडिया सल्लागार सुनील तिवारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Metroमेट्रो