शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गंगेच्या सौंदर्यीकरणासाठी पाच हजार कोटींचा लोकनिधी उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:32 IST

गंगा नदीच्या प्रवाह मार्गावर ठिकठिकाणी घाट, मोक्षधाम व सौंदर्यीकरणासाठी मी पाच हजार कोटींची विशेष योजना तयार केली असून हा संपूर्ण निधी लोकांकडून देणगीच्या स्वरूपात मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देनितीन गडकरी : मातृ सेवा संघ, महालच्या नवीन वास्तूचे लोकार्पण व कमलाताई होस्पेट यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंगा नदीच्या प्रवाह मार्गावर ठिकठिकाणी घाट, मोक्षधाम व सौंदर्यीकरणासाठी मी पाच हजार कोटींची विशेष योजना तयार केली असून हा संपूर्ण निधी लोकांकडून देणगीच्या स्वरूपात मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. केवळ आठच दिवसात एक हजार कोटीची व्यवस्था झाली आहे. उर्वरीत लोकनिधीही वेगाने उभारला जाईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.मातृ सेवा संघ, महालच्या नवीन वास्तूचे लोकार्पण व कमलाताई होस्पेट यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या अध्यक्षतेत झाले त्यावेळी ते बोलत होते. कवी सुरेश भट सभागृहात शुक्रवारी सकाळी आयोजित या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गडचिरोलीतील सर्च या संस्थेच्या सहसंचालक डॉ. राणी बंग उपस्थित होत्या. गडकरी पुढे म्हणाले, माझा जन्मही मातृ सेवा संघातील आहे. त्यामुळे या संस्थेशी माझे एक भावनिक नाते आहे. गरीब महिलेची प्रसुती सुखरूप व्हावी, यासाठी अशा संस्थांची संख्या वाढायला हवी.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही अशी सेवा मिळावी यासाठी माझ्या खात्यामार्फत पाच कोटी रुपये दिले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात कांचन गडकरी यांनी मातृ सेवा संघाच्या नवीन इमारतीसाठी कसे परिश्रम घेतले याची माहिती देत या सेवाभावी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.मातृ सेवा संघ, महालच्या अध्यक्ष कांचन गडकरी यांनी आपल्या प्रास्ताविकातून या संस्थेच्या आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकला. यावेळी या संस्थेला आर्थिक मदत करणाºया व्यक्ती व संस्था यांचा पाहुण्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी मंचावर ज्योती बावनकुळे, मातृसेवा संघाच्या सचिव वैदेही भाटे, कोषाध्यक्ष इरावती दाणी, डॉ. अरुणा बाभुळकर, डॉ. लता देशमुख, जाई जोग उपस्थित होत्या. संचालन रेणुका देशकर यांनी केले.सेवेचा आव नको, सेवाभाव हवाआज अनेक धर्मादाय संस्था सेवाभावाच्या नावावर बक्कळ पैसा कमावत असतात. हे योग्य नाही. सेवेचा आव नको, सेवाभावच हवा. मातृ सेवा संघाने सेवाभावाने इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे, हे निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यांच्या या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. सरकार म्हणून आम्ही कायम मातृ सेवा संघाच्या पाठीशी आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संस्थेचा गौरव केला.माता बनण्यास असमर्थ मुलींना दिव्यांग श्रेणीत टाकाज्या मुलींना गर्भाशयच नाही, मासिक पाळी येत नाही अशा मुली समाजात थट्टेचा विषय ठरतात. त्यांचे लग्न होत नाही. आयुष्यभर परावलंबी जीवन जगावे लागते. अशा मुलींसाठी दिव्यांगांची व्याख्या आणखी विस्तारित करून त्यात या मुलींना समाविष्ट करावे, अशी मागणी सर्च या संस्थेच्या सहसंचालक व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्या पुढे म्हणाल्या, आम्ही नागपूरच्या मेडिकलमध्ये शिक्षण घेत असताना आम्हाला कधीच मातृसेवा संघाचे कार्य दाखविण्यात आले नाही. नवीन पिढीला तरी ते दिसावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. ८५ टक्के बाळंतपण घरीच सुखरूप होऊ शकतात. फक्त १५ टक्के केसेसमध्ये रुग्णालयाची गरज पडते. परंतु आज पैशांसाठी सगळ्यांनाच रुग्णालयाचा रस्ता दाखवला जातो, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.