शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
2
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरची अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
3
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
4
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
5
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
6
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
7
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
8
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
9
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
10
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
11
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
12
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
13
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
14
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
15
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
16
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
17
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
20
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...

पाच संचाद्वारे अखंड वीजनिर्मितीची कामगिरी

By admin | Updated: March 30, 2015 02:31 IST

महाजेनकोच्या खापरखेडा येथील वीज केंद्रात २१० मेगावॅट क्षमतेचे चार आणि ५०० मेगावॅट क्षमतेचा एक असे एकूण १३४० मेगावॅट क्षमतेचे पाच संच १० सप्टेंबर २०१४ पासून अविरत वीजनिर्मिती करीत आहेत.

खापरखेडा : महाजेनकोच्या खापरखेडा येथील वीज केंद्रात २१० मेगावॅट क्षमतेचे चार आणि ५०० मेगावॅट क्षमतेचा एक असे एकूण १३४० मेगावॅट क्षमतेचे पाच संच १० सप्टेंबर २०१४ पासून अविरत वीजनिर्मिती करीत आहेत. यातील २१० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक १ ने अखंड वीजनिर्मितीचा २०० दिवसांचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केला. हा अखंड वीजनिर्मितीचा विक्रम आहे. २१० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक-१ ची ही कामगिरी महानिर्मितीच्या अलिकडच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. यापूर्वी यास वीजनिर्मिती संचाने १२ एप्रिल २००६ ते १२ आॅक्टोबर २००६ या काळात १८२.९७ दिवस अखंड वीजनिर्मितीचा विक्रम नोंदविला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा संच २६ मार्च १९८९ रोजी कार्यान्वयित करण्यात आला असून, त्या संचाला २६ मार्च २०१४ रोजी २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २१० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक १ ते ४ या चार संचांनी एकत्रित ३० आॅक्टोबर २०१४ ते ९ जानेवारी २०१५ या काळात ७०.९७ दिवस अखंड वीजनिर्मिती करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम ५०.४५ दिवसांचा होता. तो ९ मे २००७ ते २९ जून २००७ या काळात नोंदविण्यात आला होता. या वीजकेंद्राच्या इतिहासात पहिल्यांदाच संच क्रमांक १ ते ४ या संचांनी सलग नोव्हेंबर व डिसेंबर २०१४ या दोन महिन्यात १०० टक्के उपलब्धता गाठली आहे. डिसेंबर २०१४ मध्ये ०.१६५ मि.लि. प्रति युनिट इतके कमी तेल वापरून नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. यासाठी उपमुख्य अभियंता बाबुराव बागडे यांच्या नेतृत्वातील कर्मचाऱ्यांची फळी सतत वीज निर्मिती संचालन प्रक्रियेत सुधारणा करून संच बंद न होण्याचे प्रमाण कमी करीत आहेत. या केंद्रातील ५०० मेगावॅट क्षमतेचा पाचवा संच व्यावसायिकदृष्ट्या १६ एप्रिल २०१२ रोजी कार्यान्वयित करण्यात आला. या संचाने फेब्रुवारी २०१५ मध्ये ३२१.१९७ दशलक्ष युनिट वीज निर्मिती केली. ही या संचाची सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. या संचाने २४ मार्च २०१५ रोजी १२.२३४ दशलक्ष वीज निर्मिती करून विक्रम प्रस्थापित केला. उपमुख्य अभियंता गिरीश कुमरवार व त्यांचे सहकारी या संचाचे संचालन करतात. या यशस्वी वाटचालीसाठी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या नेतृत्वात राजेश राजगडकर, हेमंत रंगारी, शांताराम पौनीकर, सिद्धार्थ तितरे, हिंमत अवचार, दीपक जोशी आदी अभियंत्यांसह सर्व अधिकारी, कामगार, कंत्राटी कामगार व कंत्राटदार प्रयत्नरत आहेत. (प्रतिनिधी)