शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात पाच नव्या नगर पंचायत व नगर परिषद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 12:18 IST

पुनर्वसनामुळे जिल्ह्यातील काही गावांच्या भौगलिक रचनेमध्ये बदल होत आहे़ त्यामुळे ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र व नव्या ग्रामपंचायती तयार होत आहे़

ठळक मुद्देग्रा.पं.ची संख्या वाढणारशासन दरबारी प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी काळात जिल्ह्यातील बेसा-बेलतरोडी आणि पिपळा-बहादुरा या मोठ्या नगर परिषदा निर्मितीचे प्रस्ताव शासनाच्या नगररचना विभागाला जिल्हा परिषदेने पाठविले आहे़ तसेच कोंढाळी, नीलडोह, खापरखेडा या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदांमध्ये करावे, अशा मागणीचा प्रस्ताव पूर्वीच शासनदरबारी पडून आहे़ त्यावर अद्यापही निर्णय झाला नसला तरी, जिल्ह्यात नव्या नगर पंचायत व नगर परिषदेत वाढ होण्याचे संकेत आहे.जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत नगर परिषद आणि नगर पंचायतींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यापाठोपाठ ग्रामपंचायतीतही वाढ होत आहे़ मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या आता ७६८ होती़ त्यात एका ग्रामपंचायतीची वाढ होऊन ती संख्या आता ७६९ इतकी झाली़ कुही तालुक्यात हरदोली ग्रामपंचायतीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे़ तसेच पुनर्वसनामुळे जिल्ह्यातील काही गावांच्या भौगलिक रचनेमध्ये बदल होत आहे़ त्यामुळे ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र व नव्या ग्रामपंचायती तयार होत आहे़भिवापूर तालुक्यातील मोखेबर्डीचाही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याने तिची मंजुरी आल्यास ग्रामपंचायतीचा आकडा या वर्षातच ७७० होईल़ तसेच पिपळा-बहादुरा, बेसा-बेलतरोडी, नीलडोह, खापरखेडा या मोठ्या ग्रामपंचायती जिल्हा परिषदांच्या हातातून निसटून गेल्यास त्यांना महसुलावर पाणी सोडावे लागण्याची वेळ येणार आहे़ त्याचा थेट फटका शेष फंडाच्या तिजोरीला बसणार आहे़

टॅग्स :Governmentसरकार