शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
4
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
5
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
7
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
8
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
9
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
10
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
11
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
12
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
13
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
14
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
15
Tiger Attack: वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
16
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
17
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
18
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
19
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
20
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांत पाच ठार

By admin | Updated: June 16, 2014 01:00 IST

वर्धा जिल्ह्यात नंदोरी नजीकच्या आरंभा टोल नाका परिसरात शनिवारी रात्री रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागावून भरधाव येणाऱ्या दुचाकी आदळली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले.

वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात : टिप्पर-दुचाकी धडकेत एक गंभीरनंदोरी (वर्धा)/देवाडा(चंद्रपूर) : वर्धा जिल्ह्यात नंदोरी नजीकच्या आरंभा टोल नाका परिसरात शनिवारी रात्री रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागावून भरधाव येणाऱ्या दुचाकी आदळली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात देवाडापासून आठ किलोमीटरवरील सातारा येथे टिप्पर आणि दुचाकी अपघातात तीन ठार व एक गंभीर जखमी आहे.आरंभा टोल नाका अपघातात नितीन भगत (३०) आणि उमेश आतुटकर (३२) दोघेही रा. तासगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नितीन आणि उमेश हे दोघेही एमएच-३२ एफ-०५२० या दुचाकीने गावी परत येत होते. दरम्यान, नागपूर-चंद्रपूर महामार्गावर आरंभा टोलनाका परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सीजी ०४ जे २३१ या ट्रकवर त्यांची दुचाकी जोरदार आढळली. त्यात दोघेही जागीच ठार झाले. रस्त्यावर अंधार असल्यामुळे त्यांना रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक दिसला नसावा व हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे.समुद्रपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक कुणाचा होता हे अद्याप कळू शकले नाही. घटनेचा तपास समुद्रपूर पोलिस करीत आहे.पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा येथून आठ कि.मी. अंतरावर असलेल्या सातारा येथे टिप्पर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात तीन जण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. शालिक सात्रे (४०), प्रदीप खेडेकर (४५) दोघेही गंगापूर तसेच सोनटक्के नामक एकाचा मृतामध्ये समावेश आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील नागुलवाही येथील रवी राऊत गंभीर जखमी आहे.राजुरा तालुक्यातील काही गावांमध्ये बंधारा बांधण्याचे काम सुरु आहे. या बंधाऱ्याचे काम आटोपून चारही जण दुचाकीने पोंभुर्णाकडे जात होते. दरम्यान पोंभुर्णा येथून रेती घेऊन चंद्रपूरकडे टिप्पर येत असताना सातारा गावाजवळ अपघात झाला.अपघाताची माहिती मिळताच उमरी पोलिसांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शालिक सात्रे, प्रदीप खेडेकर यांचा मृत्यू झाला. तर गंभीर असलेले सोनटक्के आणि रवी राऊत यांना नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र सोनटक्के यांचा नागपूर येथे नेत असतानाच मृत्यू झाला तर रवीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनेचा पुढील तपास उमरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार जे.की. शेख यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)