शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पाच दिवसीय ‘कॉम्पेक्स’चा समारोप

By admin | Updated: February 9, 2016 02:49 IST

पुढील वर्षी रौप्य महोत्सवी आयोजनाचे द्वार खुले करीत यंदाच्या २४ व्या ‘कॉम्पेक्स’चा समारोप सोमवारी उत्साहात झाला.

लाखापेक्षा जास्त लोकांची हजेरी : नामांकित कंपन्यांचे पॅव्हेलियन व स्टॉलनागपूर : पुढील वर्षी रौप्य महोत्सवी आयोजनाचे द्वार खुले करीत यंदाच्या २४ व्या ‘कॉम्पेक्स’चा समारोप सोमवारी उत्साहात झाला. पाच दिवसांत लाखापेक्षा जास्त प्रेक्षक आणि ग्राहकांनी हजेरी लावली. समारोपीय समारंभात महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.आयोजन विदर्भ कॉम्प्युटर अ‍ॅण्ड मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशनतर्फे (व्हीसीएमडीडब्ल्यूए) कस्तूरचंद पार्कवर ४ ते ८ फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले. इन्टेक्स मुख्य प्रायोजक होते. यंदा ६५ पेक्षा जास्त स्टॉल आणि २५ पॅव्हेलियन होते. त्यात मिहान आणि नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. या शासकीय कंपन्यांच्या स्टॉलसह इन्टेक्स, सॅमसंग, एचपी, डेल, लिनोव्हो, ब्रदर, कॅनॉन, इप्सॉन, मायक्रोसॉफ्ट, हाईकव्हिजन आणि आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचा समावेश होता. ‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’चे अध्यक्ष राजेश साबू, सचिव दिनेश नायडू, उपाध्यक्ष विनय धर्माधिकारी आणि रणजित उमाटे, प्रशांत बुलबुले यांच्यासह अन्य सदस्यांनी प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यंदा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नागपूर नेक्स्ट’ नावाने स्पर्धा घेण्यात आली. त्यात नागपुरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून २७ प्रवेशिका आल्या. विद्यार्थ्यांनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर प्रकल्पांचे सादरीकरण केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे राजेश गणोरकर यांनी परिश्रम घेतले. ईझीपॅक सॉफ्टवेअर इंकचे सीईओ अरुण सक्सेना आणि युनिलॉजिक सिस्टिम्स प्रा.लि.चे डॉ. उल्हास चांदेकर हे स्पर्धेचे निर्णायक होते. प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार देण्यात आले. संस्थेने प्रदर्शकांची यादी, ले-आऊट प्लॅन, प्रदर्शित उत्पादने, डील, आॅफर, स्पर्धा आदींची माहिती देणारे अ‍ॅप दाखल केले. याचा फायदा ग्राहक, उत्पादक आणि विक्रेत्यांना होणार आहे. युवकांसाठी इन्टेक्स सेल्फी स्पर्धा अनोखी ठरली. पहिला पुरस्कार इन्टेक्स स्मार्टफोन आणि दुसरा पुरस्कार फीचर फोन होता. १०० इन्टेक्स बॅग आणि सेल्फी स्टीकचे वाटप करण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे व विनोद तावडे यांची भेटपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दुपारी कॉम्पेक्स प्रदर्शनाला भेट देऊन स्टॉलधारकांशी संवाद साधला. प्रारंभी त्यांनी मिहान आणि मेट्रो रेल्वे या शासकीय डोमला भेट दिली. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘नागपूर नेक्स्ट’ पॅव्हेलियनला भेट देऊन प्रदर्शित प्रकल्पांची माहिती घेतली. नागपुरातील १२ इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक २४ प्रकल्प प्रदर्शित केले होते. सर्व प्रकल्पाची त्यांनी प्रशंसा केली. अशा प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना एकाच छताखाली अद्ययावत वस्तू खरेदीची संधी असते. आयोजन दरवर्षी व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार अनिल सोले, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे यांच्यासह ‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’चे अध्यक्ष राजेश साबू, सचिव दिनेश नायडू, उपाध्यक्ष विनय धर्माधिकारी आणि रणजित उमाटे, प्रशांत बुलबुले आणि अन्य सदस्य उपस्थित होते. (वा. प्र.)