शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अँटीक आर्टिकल व्यवसायात गुंतवणुकीच्या नावावर पाच कोटीने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 00:09 IST

हिंदी चित्रपटाच्या निर्मात्याला चित्रपटासाठी फायनान्स देण्याची बतावणी करून बोगस इंटरपोल अधिकारी आणि बिल्डर्सच्या टोळीने पाच कोटीने फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देइंटरपोल अधिकारी असल्याची बतावणी : चित्रपट निर्मात्याला बनविले शिकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिंदी चित्रपटाच्या निर्मात्याला चित्रपटासाठी फायनान्स देण्याची बतावणी करून बोगस इंटरपोल अधिकारी आणि बिल्डर्सच्या टोळीने पाच कोटीने फसवणूक केल्याची घटना घडली आहे.आरोपीत शिवाजीनगर येथील रहिवासी केशव पडोळे, राजसिंह ऊर्फ राजेशकुमार तारकेश्वरसिंह रा. शततारका पॅलेस, झारखंड, आर. कृष्णकुमार रा. व्ही. एम. स्ट्रीट चेन्नई सह इतरांचा समावेश आहे. वडगाव पुणे येथील रहिवासी फिर्यादी विनित रामलालप्रसाद सिंह (४१) हे हिंदी चित्रपट तयार करण्याचे काम करतात. ऑगस्ट २०१० मध्ये विनित सिंह यांना चित्रपट बनविण्यासाठी मोठ्या फायनान्सची गरज होती. त्यासाठी त्यांनी आपल्या ओळखीचे अख्यकुमार शाहु ऊर्फ गुरुजी आणि विजय नायर यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या माध्यमातून विनित सिंह आणि त्यांचे मित्र विपुल शहा नागपुरात आले. ते केशव पडोळे यांच्या शिवाजीनगर येथील कार्यालयात भेटले. विजय नायरने केशव पडोळे आणि राजेशकुमार सिंह यांची मोठ्या बिल्डरच्या रुपाने ओळख करून दिली होती. पडोळे यांना बिल्डर असोसिएशन आॅफ इंडियाचा चेअरमन असल्याचे सांगितले होते. पडोळे यांचे मोठे रिसॉर्ट असून सुपर अँटीक आर्टिकल खरेदीचा व्यवसाय असून भारत सरकारच्या विविध विभागात पुरवठ्याचे काम असल्याची माहिती दिली होती. राजेशकुमार सिंह हे सुपर अँटीक आर्टिकलचे विशेषज्ञ सांगून डिफेन्स आणि इंटरपोलचे अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. फिर्यादी यांनी चित्रपटासाठी फायनान्सची आवश्यकता असल्याचे सांगून राजेशकुमार यांच्याशी भेट घेतली. त्यावर राजेशकुमार सिंह यांनी विनित सिंह यांना काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगितले. राजेशकुमारने विनितला सांगितले की, त्यांचे सुपर अँटीक आर्टिकलनुसार जुन्या नाण्यातून इरिडीयम धातू काढण्याचे काम आहे. हा धातू अटॉमिक रिसर्च आणि स्पेस रिसर्चमध्ये वापरला जात असल्याची माहिती दिली. या व्यवसायात अँटीक वस्तूंच्या विक्रीत कोट्यवधी रुपये मिळत असल्याचा दावा केला. त्यामुळे चित्रपट निर्माता विनितला ५० ते १०० कोटी रुपये फायनान्स सहज देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यासाठी त्यांनी सांगितलेल्या शहरात आणि जागी ये-जा करण्यासाठी विनित सिंहला खर्च करण्याची मागणी केली.त्यानंतर राजेशकुमार आणि इतर व्यक्ती विनित सिंहला २०१० ते २०१७ पर्यंत सुपर अँटीक आर्टिकलसाठी नागपूर, भुवनेश्वर, हैदराबाद, कोलकाता, हुबळी, खामगाव, महु, घोसी, गोरखपूर, ओडीशा, चेन्नई, काठमांडु, बनारस आदी ठिकाणी घेऊन गेले. तेथे प्रवास, हॉटेल आणि इतर खर्च त्यांना करायला लावला. याशिवाय अनेक नातेवाईकांच्या खात्यात रक्कम टाकण्यास सांगितले. या पद्धतीने त्यांनी फिर्यादीकडून ५ कोटी रुपये खर्च केले. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मुख्य आरोपीला अटकगुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेच्या पथकाने मुख्य आरोपी राजेशकुमार तारकेश्वर सिंहला गुरुवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. अशा प्रकरणात फसवणूक झाली असल्यास आर्थिक शाखेत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, अशोक भोयर, कमलाकर पाटील यांनी केली.सेमिनारच्या नावाने फसवणूकआरोपी राजेशकुमार सिंहने एका दिव्यांग महिलेला याच पद्धतीने सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्यासाठी मदत करण्याच्या नावाखाली खर्च करायला लावून मोठमोठे सेमिनार आयोजित केले. तेथे प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून त्यांचा विश्वास संपादन करीत नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गुंतवणुकीच्या नावाखाली मिळविले. पोलीस अशा प्रकरणांचा तपास करीत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर