शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कुख्यात अफरोजसह पाच गुन्हेगारांना २० वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 22:26 IST

शिक्षक मुलीवर अमानवीय सामूहिक बलात्कार करणाऱ्या कुख्यात मोहम्मद अफरोज जियाऊद्दीन पठाण याच्यासह एकूण पाच गुन्हेगारांना नागपूर सत्र न्यायालयाने मंगळवारी २० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : शिक्षिकेवरील सामूहिक बलात्कार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षक मुलीवर अमानवीय सामूहिक बलात्कार करणाऱ्या कुख्यात मोहम्मद अफरोज जियाऊद्दीन पठाण याच्यासह एकूण पाच गुन्हेगारांना नागपूर सत्र न्यायालयाने मंगळवारी २० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची कमाल शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी हा निर्णय दिला.अन्य आरोपींमध्ये अनिल राजू इंगळे, अश्विन अशोक दोनोडे, पुंडलिक डोमा भोयर व रोशन ऊर्फ आशिष मधुकर इंगळे यांचा समावेश आहे. सुदर्शन गजानन म्हैसकर या आरोपीला पुराव्यांअभावी सर्व गुन्ह्यांतून निर्दोष सोडण्यात आले. हे गुन्हेगार अफरोज टोळी म्हणून शहरात कुख्यात आहे. या टोळीने अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. सामूहिक बलात्काराची घटना १ डिसेंबर २०१४ रोजी रात्री कळमना पोलीस ठाण्यांतर्गत घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी २१ वर्षे वयाची होती. ती एका शाळेत शिकवायला जात होती. एक मुलगा तिचा जवळचा मित्र होता. ते नेहमी एकमेकांना भेटून गप्पात रंगून जात होते. घटनेच्या दिवशी ते स्वामीनारायण मंदिरात गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते रोडवर थांबून गप्पा करीत होते. रात्री ८ च्या सुमारास पाच आरोपी दोन दुचाकींनी तेथे आले. त्यांनी ते पोलीस असल्याचे सांगून मुलीची व तिच्या मित्राची विचारपूस सुरू केली. मुलीने ओळख विचारली असता आरोपींनी तिला धमकावले. त्यानंतर आरोपी हे मुलीला व तिच्या मित्राला वेगवेगळ्या दुचाकींवर बसवून सोबत घेऊन गेले. काही वेळाने आरोपींनी मुलीचा मित्र पळून गेल्याचे सांगितले. त्यामुळे मुलीने घाबरून आरडाओरड सुरू केली. दरम्यान, आरोपींनी तिच्याच ओढणीने तिचे तोंड दाबून धरले. मुलीला निर्जन ठिकाणी नेल्यानंतर आरोपींनी चाकूने ठार मारण्याचा धाक दाखवून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर मुलीला रोडवर आणून सोडून देण्यात आले. मुलीने घरी गेल्यानंतर वडिलांना सर्व हकीकत सांगितली. दुसºया दिवशी आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. सत्र न्यायालयात सरकारच्या वतीने अ‍ॅड. आसावरी पळसोदकर यांनी कामकाज पाहिले.अशी आहे शिक्षा

  •  संबंधित पाच आरोपींना भादंविच्या कलम ३७६ (ड)अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास.
  •  मोहम्मद अफरोज, अनिल इंगळे व रोशन इंगळे यांना कलम ३६६ अंतर्गत १० वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास, कलम ५०६ (२)अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सश्रम कारावास तर, कलम १७० अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास.
टॅग्स :Rapeबलात्कारLife Imprisonmentजन्मठेप