शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आधी महिलेची छेड, नंतर पिस्तूल काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - दारूच्या नशेत टुन्न असलेल्या गुंडांनी एका महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना याबाबत हटकले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - दारूच्या नशेत टुन्न असलेल्या गुंडांनी एका महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना याबाबत हटकले असता त्यांनी टॉय पिस्तूल काढून जीवे मारण्याची धमकी दिली. वर्धा मार्गावरच्या एका ढाब्यावर शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. यामुळे ढाब्यावर चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.

विठ्ठलनगर, मानेवाडा येथील अनुप अवधेश सिंग (वय ३७) हे शुक्रवारी रात्री वर्धा मार्गावरील लक्की ढाब्यावर जेवण करायला गेले होते. त्यांच्यासोबत एक महिला आणि एक मित्रही होता. तेथे मध्यरात्री आरोपी श्वेतांक ऊर्फ अनिकेत रामटेके, मयूर राजू बनकर (दोघेही रा. नवीन बाबुळखेडा, अजनी) शुभम संजय सोनी (रा. धोबीघाट, अजनी) आणि त्यांचे दोन साथीदार आले. ते दारूच्या नशेत टुन्न होते. सिंग यांच्यासोबत असलेल्या महिलेला पाहून ते अश्लील शेरेबाजी करू लागले. त्यामुळे सिंग यांचे मित्र हेमंत कुबडे यांनी आरोपींना समजाविले असता आरोपी शिवीगाळ करू लागले. एकाने त्याच्या खिशातील टॉय पिस्तूल काढले अन् कुबडेवर ताणले. त्याचे बॅरल मागे-पुढे ओढून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी घालत असलेल्या हैदोसामुळे ढाब्यावर चांगलाच गोंधळ निर्माण झाला. माहिती कळताच बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी सिंग यांची तक्रार नोंदवून घेत आरोपी रामटेके, बनकर आणि सोनी या तिघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

----